Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शाळकरी मुलीला वाचविताना कार उलटल्याने एकाचा मृत्यू तर मुलीसह आठजण गंभीर जखमी
अपघात

शाळकरी मुलीला वाचविताना कार उलटल्याने एकाचा मृत्यू तर मुलीसह आठजण गंभीर जखमी

नाशिक-पुणे महामार्गावर डोळासणे येथील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

अचानकपणे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाळकरी मुलीला वाचविण्यासाठी कार चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार पलटी झाली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला. तर मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत.

विजय शंकर डेरे (वय-६२, रा. नारायणगाव, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या कारमधील व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील डोळासने शिवारामध्ये बाबळेवाडी येथे हा अपघात झाला.

अपघातात विजय शंकर डेरे यांचा मृत्यू झाला असून कारमधील रोहित विजय डेरे (वय-२३), उज्वला विजय डेरे (वय-४८), मोहित विजय डेरे (वय-३०), सविता अनिल शेटे (वय-४८), शैला दिलीप वारुळे (वय-५८), विनायक शिवाजी डेरे (वय-५०) (सर्व रा. नारायणगाव, पुणे), शोभा दशरथ वायाळ (वय-५४, रा. नांदूर,नाशिक) यांच्यासह रस्ता ओलांडणारी शाळकरी मुलगी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय-१२ , सध्या रा. बाळेश्वर आश्रमशाळा, सारोळे पठार, मूळ गाव रा. पाटगाव आळेफाटा पुणे) गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक येथे अस्थी विसर्जन करून डेरे कुटुंब हे कार क्रमांक एम. एच. १४ के. बी. ८७१४ मधून नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात आले असता वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडा झुडपातून अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली.

त्यावेळी कार चालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला. कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन ५०० मीटरवर महामार्गाच्या खाली जाऊन थांबली. यात कारचे टायर फुटले असून मोठे नुकसान झाले आहे. कारमधील विजय डेरे यांचा मृत्यू झाला. तर वैष्णवी मेंगाळसह कारमधील वरील आठजण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार अरविंद गिरी, पोलीस नाईक नंदकुमार बर्डे, भरत गांजवे, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. अपघातादरम्यान रस्त्यावर बराच काळ वाहतूक खोळंबली होती. महामार्ग पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 142
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.