Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी लोकसभेची जागा भाजपाच्या रडारवर; यावेळी असेल पक्षाचा स्वतंत्र उमेदवार
राजकारण

शिर्डी लोकसभेची जागा भाजपाच्या रडारवर; यावेळी असेल पक्षाचा स्वतंत्र उमेदवार

कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामास लागण्याचे माजी मंत्री संजय भेगडे यांच्या आवाहन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

येणारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वतंत्ररीत्या ‘कमळ’ या निवडणुक चिन्हावर लढविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामास सुरुवात करावी, असे आवाहन लोकसभा प्रवास योजना राज्य संयोजक माजी मंत्री संजय भेगडे यांनी केले आहे.

उत्तर नगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शिर्डी लोकसभा प्रवास योजनेसंदर्भात जिल्हास्तरीय बैठक शिर्डी येथे राज्य संयोजक व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम व बाळासाहेब मुरकुटे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर आदी उपस्थित होते.

भेगडे म्हणाले, देशातील काही लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात असे अठरा मतदारसंघ आहे की जिथे भारतीय जनता पक्षाने कधीच आपला उमेदवार दिलेला नाही. त्यापैकी शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे. यावेळी मात्र या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना मेहनत घ्यावयाची आहे.

गुजरात निवडणुकीनंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा या मतदारसंघात दौरा होणार आहे. तर जलजीवन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल या मतदारसंघाचे पालक असून “हर घर जल, नल से जल” ही पंतप्रधान मोदींची महत्त्वकांक्षी योजना येथे राबविली जात आहे. याशिवाय या मतदारसंघात एक हजार कोटी पेक्षा जास्त निधींची विकास कामे सुरू आहेत. याचा देखील फायदा लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळेल असा आत्मविश्वास भेगडे यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे, सुधाकर गुंजाळ, गणेश राठी, अकोले तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, संगमनेर तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, कोपरगाव तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्ता काळे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दिपक पटारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राम आहेर आदीनी मागील दौऱ्याचे अनुभव कथन केले.

यावेळी शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांचे हस्ते माजी मंत्री भेगडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक जिल्हा संयोजक नितीन दिनकर यांनी तर सूत्रसंचालन योगीराज परदेशी यांनी केले. आभार सोशल मिडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 121
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.