Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रामदेव बाबा यांचे वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे : डॉ. नीलम गोऱ्हे
राजकारण

रामदेव बाबा यांचे वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे : डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य महिला आयोगही रामदेव बाबांना पाठविणार नोटीस
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. महिलांविषयी विकृत मानसिकता दाखवणाऱ्या रामदेव बाबांचा शिवसेना उपनेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निषेध केला आहे. अशातच महाराष्ट्र राज्य महिला आयोग त्यांच्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबांना नोटीस पाठवणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. बाबा रामदेव यांच्या महिलांविषयीच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. महिलांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर या विधानाचा रामदेव बाबा यांच्याकडून खुलासा मागविला जाणार आहे, त्या संदर्भात महिला आयोगाकडून नोटीस बजावली जाणार आहे.

नेमके काय म्हणाले होते रामदेव बाबा;

“महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, महत्त्वाचं म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नव्हे तर, अमृता फडणवीस १०० वर्षे तरुण राहतील, असंही ते म्हणाले. याशिवाय, साडीमध्ये महिल्या चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात. माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”.दरम्यान शिवसेना उपनेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील रामदेव बाबा यांचे वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे असल्याचे सांगत योगा सारख्या भारतीय परंपरेतील श्रेष्ठ बाबीसोबत रामदेव बाबाचे नाव लावणे आता लांच्छनास्पद होईल. रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप आहे. याबाबत जाहीर निषेध व्यक्त करते. या निषेधाचे पत्र ट्विटरवर टाकले आहे.

रामदेव बाबांविषयी काय म्हणाल्या डॉ. नीलम गोऱ्हे

रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करत आहे. तसेच याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत आहे. त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येकच पुरुष अशा प्रकारे महिलांकडे पाहत नसतात. आपल्या घरात असलेले पुरुष, भाऊ, मित्र, सहकारी अशा अनेक पुरुषांबरोबर स्त्रीचा दैनंदिन जीवनात संपर्क येत असतो. मात्र आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. पण याबाबत त्यांनीही यावर निषेध म्हणून बोलायला हवे होते. योगा सारख्या भारतीय परंपरेतील श्रेष्ठ बाबीसोबत रामदेव बाबाचे नाव लावणे आता त्यांच्या या विधनांने लांच्छनास्पद होईल. रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप आहे. याबाबत जाहीर निषेध व्यक्त करते.

#रामदेवबाबांचे योग परंपरेला लांच्छन आणणारे वक्तव्य :
योगा सारख्या भारतीय परंपरेतील श्रेष्ठ बाबीसोबत रामदेव बाबाचे नाव लावणे आता लांच्छनास्पद होईल.रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप आहे. याबाबत जाहीर निषेध व्यक्त करते. @ShivSena @ANI pic.twitter.com/hghRfZVRbz

— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 26, 2022

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 131
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.