Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेसाठी राज्यातून श्रीरामपूर विभागातील दहा विद्यार्थ्यांची निवड
शिक्षण

दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेसाठी राज्यातून श्रीरामपूर विभागातील दहा विद्यार्थ्यांची निवड

जिल्ह्यातून निवडले गेलेले सर्व विद्यार्थी संगमनेरचेच; भारतीय टपाल विभागाची योजना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

टपाल विभागाच्या दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेत राज्य पातळीवर अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर विभागातील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे निवडले गेलेले सर्व विद्यार्थी संगमनेर मधील विविध शाळांचे आहेत, अशी माहिती श्रीरामपूर डाक अधीक्षक हेमंत खडकेकर व संगमनेरच्या मुख्य डाकघर येथील विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील नक्ष चंद्रकांत खामकर (इयत्ता सहावी), स्वामिनी संदीप चव्हाण (इयत्ता सातवी), प्रज्योत प्रदीप शेळके (इयत्ता नववी), मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयातील श्रद्धा विलास ताजने (इयत्ता आठवी), सुमित महेश देशमुख (इयत्ता आठवी), तनिष्क संतोष दिवे (इयत्ता नववी), अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमधून समरजीत विश्वास वाघ (इयत्ता सातवी), दिव्याल कैलास खाडे (इयत्ता सातवी) आणि ध्रुव ग्लोबल स्कूलमधील तेज निलेश जैन (इयत्ता सहावी) आणि गार्गी संजय विखे (इयत्ता सातवी) यांचा समावेश आहे.

भारतीय टपाल विभागाच्या वतीने टपाल तिकिटांचा संग्रह (फिलाटेली छंद) व संग्राहक वाढविण्याच्या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘दीनदयाळ स्पर्श योजना २०२२-२३’ चे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत महाराष्ट्रामधून चाळीस विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी दहा विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातील असून डाक विभागाच्या श्रीरामपूर विभागातून निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे निवड झालेले सर्वच्या सर्व दहा विद्यार्थी हे संगमनेरमधील आहेत.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ६ हजार रुपये शिष्यवृत्ती डाक विभागा मार्फत दिली जाणार आहे. लहान वयात मुलांमध्ये टपाल तिकीट संग्रह करण्याच्या छंदास प्रोत्साहन देण्यासाठी या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. श्रीरामपूर विभागाचे डाक अधीक्षक हेमंत खडकेकर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना संगमनेरच्या मुख्य डाकघर येथील विपणन अधिकारी अमोल गवांदे, पोस्ट मास्तर महेश कोबरने, रोखपाल अमित देशपांडे आदींनी मार्गदर्शन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 114
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.