Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील अतिरिक्त खाती सोपविली दुसऱ्या मंत्र्यांकडे
राजकारण

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील अतिरिक्त खाती सोपविली दुसऱ्या मंत्र्यांकडे

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिंदे फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता लांबणीवर पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील अतिरिक्त खात्यांचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे सोपविल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार न करता मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याकडील नऊ खात्यांचा अतिरिक्त पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपविला गेल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात वीस मंत्री कार्यरत आहेत.

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जावा अशी मुख्यमंत्री शिंदे गटातील समर्थक आमदार आणि भाजपच्या आमदारांची मागणी होती. त्यामुळे नव्याने मंत्रिमंडळ विस्तार करून पुन्हा खातेवाटप जाहीर केले जाईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील अतिरिक्त पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपविल्याने हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली. मात्र महामंडळावरील नियुक्ती जाहीर केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी कोणाकडे सोपविला कोणत्या खात्याचा पदभार …

उद्योग मंत्री उदय सामंतांकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे परिवहन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम खाते).

बंदरे, खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्याकडे पणन खाते.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खाते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मृद आणि जलसंधारण खाते.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक आणि औकाफ खाते.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण व वातावरणीय बदल, सामान्य प्रशासन ही खाती.

रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरेंकडे मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन खाते.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांकडे माहिती आणि जनसंपर्क खाते सोपविण्यात आले असल्याची माहिती मिळते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 118
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.