Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील वकृत्व स्पर्धेत १० तालुक्यातील ७३ विद्यालयामधील २४६ स्पर्धकांचा सहभाग
शिक्षण

संगमनेरमधील वकृत्व स्पर्धेत १० तालुक्यातील ७३ विद्यालयामधील २४६ स्पर्धकांचा सहभाग

पिंपरणे येथील चैतन्य गगनगिरी करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 28, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

संगमनेर : संगमनेर साहित्य परिषद आणि पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत १० तालुक्यातील ७३ विद्यालयामधील २४६ स्पर्धकांच्या सहभागामुळे या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचे हे बारावे वर्ष होते. परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख आणि संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांच्या उपस्थितीत केलेल्या दीप प्रज्वलनाने स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, डॉ. जी. पी. शेख, डॉ. हनुमंत मोटेगावकर, प्रा. शशांक गंधे, नंदकुमार बेल्हेकर, प्रकल्प सचिव कैलास काळे, सुरेश ठोंबरे, माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष पवार, प्राचार्य मुकुंद डांगे, स्वाती देशमुख, प्रकल्पप्रमुख बाळकृष्ण महाजन, विभागप्रमुख ललित शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

चार विविध गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात इयत्ता तिसरी आणि चौथीच्या गटामध्ये पन्नास स्पर्धक सहभागी झाले होते. पाचवी ते सातवीच्या दुसऱ्या गटामध्ये नव्वद स्पर्धक, आठवी ते दहावीच्या गटामध्ये सत्याहत्तर व अकरावी बारावीच्या गटांमध्ये एकोणतीस स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धक विद्यार्थी त्या-त्या विद्यालयांमधून निवडून पाठवलेले असल्यामुळे एकापेक्षा एक वरचढ अशी भाषणे स्पर्धेत स्पर्धकांनी सादर केली.

या स्पर्धेत यशस्वी स्पर्धक निवडताना परीक्षकांची कसोटी लागली. विद्यार्थी स्पर्धकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करत आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण केले.

स्पर्धक विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, परीक्षक या सर्वांसाठी भोजन व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली होती. प.पू. गगनगिरी महाराज विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व स्वयंसेवक विद्यार्थी या व्यवस्थेत स्वयंस्फूर्तीने सर्व स्पर्धक व परीक्षक शिक्षक यांची सुयोग्य व्यवस्था पहात होते.

विजेत्या स्पर्धकांना बारा फिरते सांघिक करंडक, बारा वैयक्तिक कायमस्वरूपी स्मृतिचिन्ह आणि सुमारे साडेबारा हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय सहभागी सर्व स्पर्धकांना परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा संदेश असलेले आकर्षक प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

या स्पर्धांसाठी प्रा. सुरेश परदेशी, स्मिता गुणे, सुलभा जोशी, इद्रीस शेख, गिरीश सोमानी, मनोज साकी, अनिल सोमणी, लक्ष्मण ढोले, प्रकाश कोटकर, श्रीमती मंगला पराशर आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थ व पालक यांचाही उत्तम प्रतिसाद व सहभाग या स्पर्धांना लाभला .

संगमनेर साहित्य परिषदेच्या सदस्यांनी आयोजनाबरोबरच परीक्षणाची महत्त्वाची भूमिका या स्पर्धांच्या वेळी पूर्ण केली आहे. प्रा. डॉ. अलका पेटकर, श्वेता सराफ, पुष्पा नि-हाळी, स्वप्नील कोल्हे, दिलीप क्षीरसागर, सुरेश म्हाळस, सौरभ म्हाळस, नंदकुमार बेल्हेकर, निलेश पर्बत, संतोष पवार, बाबासाहेब मेमाणे आदींनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 125
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

शिक्षकांच्या समर्पित योगदानामुळे शिंदेवाडी शाळा समृद्ध : विस्तार अधिकारी अनिल गायकवाड

June 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
यश / निवड / पुरस्कार

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संगमनेर तालुका…

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.