Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खचलेल्या पुलावरून विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत सुरू; प्रशासन पूलाची दुरुस्ती कधी करणार
महाराष्ट्र संवाद विशेष

खचलेल्या पुलावरून विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत सुरू; प्रशासन पूलाची दुरुस्ती कधी करणार

विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या कसरतीचा व्हिडिओ 'महाराष्ट्र संवाद न्यूज'कडे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 28, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अनंत पांगारकर

संगमनेर : म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरानंतर स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर, गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने तब्बल अडीच महिन्याच्या कालावधीनंतर देखील त्याची दुरुस्ती प्रशासनाला करता आलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या पुलावरून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पुलावरील शॉर्टकट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. या धोकादायक शॉर्टकटचा व्हिडिओ येथील नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठवला आहे.

यावर्षी म्हाळुंगी नदी वारंवार आणि दीर्घकाळ प्रवाही राहिली आहे. त्यातच झालेल्या पावसामुळे नदीला पूर आल्याने नदीवरील घोडेकर मळ्याकडे जाणारा कच्चा फुल वाहून गेला. मात्र या लगतच असलेला साई मंदिर, पंपिंग स्टेशन, गंगामाई घाट, घोडेकर मळा, वेताळेश्वर महादेव मंदिर आदी भागाला जोडणारा पूल वाहतूक योग्य असल्याने फारसा ताण जाणवला नाही. मात्र काही दिवसातच म्हाळुंगी नदीवरील हा पूल देखील खचला. पूल खचल्यामुळे तो धोकादायक बनल्याचे कारण पुढे करत पालिका प्रशासनाने वाहतुकीसाठी खचलेला पूल बंद केला. वास्तविक पुराच्या पाण्यामुळे पूल खचला असला तरी पूल खचण्यासाठी आवश्यक कारणे मानवनिर्मित आहेत.

हा पूल ओलांडून हजारो नागरिक आणि या परिसरात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना बराच काळ दुरच्या मार्गाने ये जा करावी लागत होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेत पालिका प्रशासनाने या पुलाजवळून तात्पुरत्या स्वरूपात दुसरा पूल उभा केला आहे. मात्र तरीदेखील दिगंबर गणेश सराफ विद्यालय, देवेंद्र ओहरा महाविद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना मोठा हेलपाटा पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी पाळीच खचलेला पूल ओलांडण्याची कसरत करताना दिसतात. पूल दुरुस्तीसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. सध्या पालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. पुलाचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव आणि खर्चाची तरतूद संबंधित विभागाकडून होत नसल्याचे दिसते.

पुलाचा खचलेला भाग अधांतरी लोबकळत असून तो कधीही कोसळू शकतो, या धोक्याची जाणीव असली तरी देखील पुलावरील जीवघेणा प्रवास सुरूच आहे. या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ या भागातील सुज्ञ नागरिक मुकेश परदेशी यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’कडे पाठवत प्रशासनाने हा पूल तातडीने दुरुस्त करण्यासाठी योग्य ती पावले टाकण्याची मागणी केली आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी हा व्हिडिओ आम्ही येथे देत आहोत.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2022/12/VID-20221228-WA0015.mp4
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 155
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

नवी दिल्ली: देशातील विविध परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी…

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.