Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार डॉ. सुधीर तांबे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड
राजकारण

आमदार डॉ. सुधीर तांबे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड

संगमनेरला राजकीय क्षेत्रात मिळाला बहुमान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय व निमशासकीय, अशासकीय कर्मचारी, यांच्या विविध प्रश्नांसाठी विधानपरिषदेत सातत्याने पाठपुरावा करणारे, ‘नेता नव्हे मित्र’ अशी ओळख असलेले नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांची विधानपरिषदेच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे.

आमदार डॉ. तांबे यांनी बी. जे. मेडिकल सारख्या देशातील नावाजलेल्या महाविद्यालयातून एम. एस. शिक्षण घेतल्यानंतर संगमनेरमध्ये चार दशके गोरगरिबांना आरोग्य सेवा दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सहकार, शिक्षण, समाजकारण, कृषी अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देताना आदिवासी, अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोठे काम केले.

लोक आग्रहास्तव राजकारणात आल्यानंतर त्यांनी अत्यंत कार्यक्षम आमदार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात सातत्याने बेरोजगार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, विविध संघटना यांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा केला आहे. शिक्षण क्षेत्रात कायम विना अनूदानित शाळेचा ‘कायम’ शब्द काढण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी, बेरोजगार महामंडळ असावे, रस्ते अपघात, शेतकरी विमा प्रश्न, ज्युनिअर कॉलेजच्या शाळा व तुकड्यांना मान्यता, नवीन शिक्षक भरती, कला व क्रीडा विषयासाठी स्वतंत्र शिक्षक असे प्रश्न त्यांनी सातत्याने शासन दरबारी मांडले आहेत.

काँग्रेस पक्ष व पुरोगामी विचारांशी कायम एकनिष्ठ असलेले तांबे हे 2009 पासून नाशिक पदवीधर मतदार संघाचे विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची ही तिसरी टर्म असून आता त्यांची नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून विधान परिषदेत निवड झाली आहे.

तांबे यांच्या गटनेतेपदाबद्दलच्या निवडीबद्दल काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आमदार भाई जगताप आणि अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, टीडीएफ संघटना, विविध पुरोगामी संघटना, विविध कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 200
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.