Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुलाने विवाहित महिलेला पळविले; बदनामीच्या भीतीने कुटुंबातील सात जणांची नदीत आत्महत्या
महाराष्ट्र संवाद विशेष

मुलाने विवाहित महिलेला पळविले; बदनामीच्या भीतीने कुटुंबातील सात जणांची नदीत आत्महत्या

मृतात तीन लहान मुलांचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर / दौंड : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील वाहणाऱ्या भीमा नदीमध्ये तीन लहान मुलांसह सात जणांचे मृतदेह सापडले आहे. एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह नदीत आढळल्याने पुणे आणि नगर जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून बदनामीच्या भीतीने या सर्वांनी आयुष्य संपविल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

मंगळवारी भीमा नदी पात्रात तीन लहान मुलांचे मृतदेह आढळले. तत्पूर्वी नदीपात्रात चार मृतदेह आढळले होते. एकाच वेळी सात मृतदेह आढळून आल्याने तपास यंत्रणा चक्रावून गेली होती. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे. मोहन उत्तम पवार (वय-४५), संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय-४० दोघेही रा. खामगाव ता. गेवराई जि. बीड), श्याम पंडित फुलवरे (वय-२८), राणी श्याम फुलवरे (वय-२५), रितेश उर्फ भैय्या (वय-७), छोटू (वय-५) आणि कृष्णा श्याम फुलवरे (वय-३, सर्व रा. हातोला ता. वाशी, जिल्हा उस्मानाबाद) हे सर्वजण गेल्या एक वर्षापासून निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर येथे मजुरीसाठी आलेले होते.

पवार पती-पत्नी हे श्याम फुलवरे यांचे सासू-सासरे असून राणी फुलवरे यांचे आई वडील होते. गेल्या पाच दिवसात टप्प्याटप्प्याने हे आढळले आहे. बुधवारी (ता. १८) पारगाव येथील मच्छीमारांना एका महिलेचा पहिला मृतदेह आढळला होता. त्यापाठोपाठ रविवारपर्यंत दोन पुरुष आणि आणखी एका महिलेचा मृतदेह आढळला. राणी फुलवरे हिच्या कपड्यांमध्ये मोबाईल व सोने खरेदीची पावती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. त्यांच्याबरोबर आणखी तीन मुले असल्याचे पोलीस तपासात नातेवाईकांकडून समोर आले.

त्यामुळे वाघोली येथील पीएमआरडीएचे शोध पथक बोलावून नदीपात्रात शोध घेण्यात आला असता तीनही मुलांचे मृतदेह आढळून आले. तपासामध्ये मोहन पवार यांना अमोल व राहुल अशी दोन मुले असून त्यापैकी अमोल हा त्यांच्यासोबत राहतो. तर राहुल हा पुण्यात असतो. अमोल याने दोन दिवसांपूर्वी नात्यातीलच एका विवाहित महिलेला पळवून आणले. या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले. त्यांनी तिला परत सोडून येण्यास सांगितले होते. यामुळे आपली इज्जत जाईल, नाहीतर आम्ही सर्वजण विष पितो किंवा जीव तरी देतो अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला होता. मुलगा त्या महिलेला घरी सोडून न आल्यामुळे बदनामीच्या भीतीने या सर्वांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 431
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.