Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चौघा दुचाकी चोरांची टोळी पकडली; नवे निरीक्षक भगवान मथुरे यांचे पहिले यश
गुन्हेगारी

चौघा दुचाकी चोरांची टोळी पकडली; नवे निरीक्षक भगवान मथुरे यांचे पहिले यश

गुन्हेगारी संपुष्टात येण्यासाठी पावले टाकण्याची गरज
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पाऊले टाकणाऱ्या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. एका अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींच्या टोळीकडून पथकाने सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांनी संगमनेर मध्ये उच्छाद मांडला आहे. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केल्याने या गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले असतानाच नव्या निरीक्षकांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी उचललेली पावले कौतुकास्पद ठरली आहे. नवीन निरीक्षक मथुरे आपल्या कामाची छाप संगमनेरकरांमध्ये कशा पद्धतीने पाडतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.

अल्पवयीन बालकासह सुमित संजय कदम (रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर), मोबीन मुबारक शेख व महंमद फरदिन नाजिर शेख, (दोन्ही रा. रेहमतनगर, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी आत्तापर्यंत सात चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहे. सिन्नर आणि संगमनेरमधून या मोटारसायकलींची आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केले.

संगमनेरमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून दररोज दुचाकी चोरीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांनी यासंदर्भात गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना सूचना केल्या होत्या. मथुरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक भोर यांच्या कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस कर्मचारी फुरखान शेख, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी अण्णासाहेब दातीर, अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, शहर पोलीस ठाण्याचे अमित महाजन, दत्तू चौधरी यांचे पथकाला सोबत घेत आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. ओम दीपक जानमाळी (रा. नाशिक, हल्ली संगमनेर) यांच्या चोरी गेलेल्या दुचाकीचा शोधा दरम्यान पथकाला एका अल्पवयीन दुचाकी चोरासंदर्भात संदर्भात माहिती मिळाली.

या अल्पवयीन बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुमित संजय कदम यांच्यासोबत दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. तसेच या दुचाकी मोबीन मुबारक शेख, महंमद फरदिन नाजिर शेख यांना विक्री केल्याचे सांगितल्याने पथकाने त्यांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले. यामुळे काही अंशी दुचाकी चोरी थांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 516
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.