महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक:
दोन दिवसांपूर्वी गंगापूर रोड परिसरात झालेल्या ध्रुवांशी भूषण रोकडे या तीन महिन्याच्या मुलीच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मातेनेच या चिमुकलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नाशिक पोलिसांनी चोवीस तासाच्या आतच या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. सासरच्या होणाऱ्या जाताला कंटाळून मातेनेच तीन महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरून तिची हत्या केली. या थरकाप उडविणाऱ्या घटनेमुळे नाशिक शहर हादरले आहे. युक्ता रोकडे असे निर्दयी आरोपी मातेचे नाव आहे.
नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली होती. सातपूर मधील एका कंपनीत सुपरवायझर असलेले भूषण रोकडे हे पत्नी आई आणि तीन महिन्यांची चिमुकली ध्रुवांशी हिच्यासोबत ध्रुवनगरमध्ये राहतात. ते कामावर असताना घरी आई आणि पत्नी होते.
रात्री रोकडे यांचे आई दूध आणण्यासाठी गेली असता घरी तीन महिन्याची चिमुकली आणि तिची आई असे दोघेजण होते. घरात कोणी नसल्याचे बघून पंजाबी ड्रेस घातलेली एक महिला घरात आली. तिने या चिमुकलीच्या मातेच्या नाकाला रुमाल लावला आणि बेशुद्ध झाल्यानंतर या चिमुकलीची गळा चिरून हत्या केली. काही वेळानंतर दूध घेऊन आलेल्या भूषण रोकडे यांच्या आईला सून बेशुद्ध अवस्थेत तर चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याचे दिसून आले होते.
चिमुकलीच्या खुनाचा तपास करताना पोलिसांनी चिमुकलीच्या आईला उलट सुलट प्रश्न विचारल्यानंतर या धक्कादायक खून प्रकरणाचा उलगडा झाला.

