Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाची कत्तलखान्यावर कारवाई; १७०० किलो गोमांसासह सुमारे दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाची कत्तलखान्यावर कारवाई; १७०० किलो गोमांसासह सुमारे दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नव्या निरीक्षकांच्या काळातही कत्तलखाने सुरूच; अल्पवयीन आरोपीसह दोघे ताब्यात तर चौघे फरार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/04/2023Updated:20/04/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
वारंवार टाकलेल्या छापल्यानंतर देखील संगमनेरातील बहुचर्चित कत्तलखाने सुरूच आहेत. कोणत्याही प्रकारच्या कारवाईला न घाबरणाऱ्या कसायांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आपले धंदे सुरूच ठेवले आहे. गुरुवारी पहाटे पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयातील पथकाने केलेल्या एका कारवाईत तब्बल १७०० किलो गोमांस आणि दोन चार चाकी वाहने असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील मोगलपुरा येथे आयुब तांबोळी यांच्या चाळेच्या दोन नंबरच्या खोलीमध्ये सोन्या कुरेशी व त्याचा साथीदार सलीम कुरेशी हे दोघे गोवंश जनावराची कत्तल करत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. उपाधीक्षक संजय सातव यांनी आपल्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव व प्रमोद गाडेकर यांना सोबत घेत ही कारवाई केली.

पथकातील कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी रात्री सव्वा वाजता छापा टाकला असता तेथे तिघेजण गोमांस एका पिकअप आणि ओमनी कारमध्ये भरताना पथकाला दिसले. त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर ओमनी आणि पीकअप चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले. पकडलेल्या आरोपींमध्ये आसिफ इकबाल कुरेशी (वय ३२ वर्ष ह. रा. मदिनानगर संगमनेर मूळ रा. मालेगाव, नासिक) याच्या सहित एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी हे गोमांस सोनू रफिक कुरेशी व सलीम साटम कुरेशी या दोघांचे मालकीचे असल्याबाबत सांगितले. वाहन चालकांविषयी मात्र पोलिसांना माहिती मिळू शकली नाही.

भाड्याने देणे आहे

पोलिसांनी आपल्या कारवाईमध्ये कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस, एक पिकअप, एक ओमनी कार, कुऱ्हाड कानस चाकू आधी कत्तलीसाठी लागणारे नऊ लाख साठ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आसिफ इकबाल कुरेशी, सोनू रफिक कुरेशी सलीम साटम कुरेशी यांच्यासह दोन्ही वाहनांवरील अज्ञात वाहन चालक आणि एका विधी संघर्ष बालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील दोघांना पोलिसांनी पकडले असून अन्य आरोपी फरार झाले असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान पोलीस उपाधीक्षकाच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर कत्तलखाना चालकाचे नाव निष्पन्न झाले असून कत्तलखाना चालक फरार झाले. फरार झालेल्या दोघांचालकांसह दोन्ही कत्तलखाना चालकांना पकडण्याचे काम शहर पोलिसांना करावे लागणार आहे. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी अद्यापही फरार असून त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे शहर पोलीस या आरोपी संदर्भात नेमकी काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक पद जवळपास सात महिन्याहून अधिक काळ झाला तरी रिक्तच आहे. उपाधीक्षक पदाचा प्रभारी भार शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे आहे. व्यस्त कालावधीत देखील सातव संगमनेर मध्ये सातत्याने आपल्या पथकामार्फत कारवाई करताना दिसतात. तर दुसरीकडे शहर पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हटविले असून त्यांच्या जागेवर नव्या कार्यक्षम निरीक्षकांची नियुक्ती झाली असली तरी नव्या निरीक्षकांच्या कार्यकाळात देखील शहरातील कत्तलखाने या कारवाईनंतर सुरूच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कत्तलखान्या संदर्भात काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 384
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.