Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

July 20, 2026

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत, गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला; यशवंतराव गडाख
महाराष्ट्र संवाद विशेष

उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत, गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला; यशवंतराव गडाख

ठाकरे गडाख भेटीत पवार ठाकरे यांच्या मैत्रीला दिला उजाळा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 12, 2023Updated:May 12, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोनई (महाराष्ट्र संवाद न्यूज)

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत. गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असला तरी येणाऱ्या निवडणुकीत जनता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वास माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी आणि संयमी नेते म्हणून ओळख असलेल्या साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी त्यांच्या भेटीला आले होते. ठाकरे-गडाख भेटीत गडाख यांनी ठाकरेंचे तोंड भरून कौतुक करत ठाकरे आणि पवार यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गडाख म्हणाले, ठाकरे कुटुंबाशी आमची मैत्री जुनी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध मैत्रीपूर्ण होते. तेच संबंध पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे यांनी जेष्ठांना डावलत शंकररावांना मंत्रीपद दिले. त्यामुळे त्यांची साथ सोडायची नाही, त्यांच्यासोबत ठामपणे राहायचे असा सल्ला आपण शंकररावांना दिला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला आमदारांची जमवाजमव करायची होती, तेव्हा त्यांनी आमच्याकडे आमदार शंकरराव गडाख यांच्या पाठिंबाबद्दल विचारणा केली. त्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी मुंबईला जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मंत्रीपद द्या किंवा नका देऊ आम्ही तुमच्या सोबत राहू असा शब्द ठाकरे यांना मी दिला होता.

राज्यात नंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले त्यांनी आमच्या पाठिंबाची जाणीव ठेवत पक्षातील ज्येष्ठांना डावलून शंकररावांना मंत्रिपद दिले. त्यामुळे ठाकरे यांच्यासोबत ठामपणे राहायचे असा सल्ला मी शंकररावांना दिला. मधल्या काळात अनेक प्रलोभने आले मात्र तरीदेखील आम्ही ठाकरे यांची साथ सोडली नसल्याचे गडाख म्हणाले.

२०२४ नंतर पवार देशाचे पंतप्रधान

आत्तापर्यंत शरद पवारांना पंतप्रधान पद मिळू शकले नाही. सध्या देशात त्यांच्या एवढा दुसरा अनुभवी नेता नाही. परिस्थिती बदलली तर २०२४ नंतर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. वयाची ८० वर्षे पार केल्यानंतर देखील पवार राजकारण आणि समाजकारण सक्रिय आहेत. त्यांची कारकीर्द संघर्षमय राहिली आहे. आजही ते लोकांमध्ये जातात, या वयात अशी हिम्मत दाखविणारे कदाचित ते शेवटचे नेते ठरतील. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्यांचे वजन आहे.

२०२४ नंतर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात आत्तापर्यंत दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडीने त्यांच्याबद्दल श्रेष्ठींचे कान भरले. त्यामुळे या पदासाठी त्यांचे नाव मागे पडत असे. आम्ही मात्र त्यांच्यासोबत कायम राहिलो.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 427
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून…

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.