Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सात लाखाची रोकड पळविली… आणि घडले असे काही की तिघांपैकी दोघे परप्रांतीय थेट पोलिसांच्या ताब्यात; तरीही एकाने तीस हजार लांबविलेच…
गुन्हेगारी

सात लाखाची रोकड पळविली… आणि घडले असे काही की तिघांपैकी दोघे परप्रांतीय थेट पोलिसांच्या ताब्यात; तरीही एकाने तीस हजार लांबविलेच…

कृषी उत्पन्न बाजार समितीत भर दिवसा घडली घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

दुचाकी आणि दागिन्यांच्या चोऱ्या नित्याच्याच झालेल्या संगमनेरमध्ये आता दिवसाढवळ्या नागरिकांवर लक्ष ठेवत रोकड पळविण्याच्या घटना सुरू झाल्या आहे. अशीच सात लाखाची रोकड पळविण्याच्या नादात तिघांपैकी दोघा बिहारींना पकडण्यात यश आले आहे.

गेल्या काही वर्षातील अकार्यक्षम पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे संगमनेरमध्ये चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. चोरी केल्यानंतर पकडले जात नसल्याने या चोरट्यांचे मनोधैर्य वाढले आहे. नव्याने पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेल्या निरीक्षक भगवान मथुरे यांना या चोरट्यांचा बिमोड करण्यासाठी पावले टाकावी लागणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगताशी अवैध व्यावसायिकांशी अर्थपूर्ण लागेबंधे निर्माण झालेल्या कर्मचाऱ्यांना या पोलीस ठाण्याबाहेरचा रस्ता दाखवत नवी टीम त्यांना उभे करावी लागणार आहे.

बस स्थानक, सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखालील भाग चोरट्यांचे मुख्य केंद्र बनलेला असतानाच आता कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही चोरटे हात मारू लागल्याचे दिसते. बुधवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पांडुरंग यशवंत शेटे (रा. मालदार रोड, सुकेवाडी) हे काही कामानिमित्त संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आले होते. आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले रोख ७ लाख रुपये ते बाहेर काढत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या तीन आरोपींनी हातातील पैसे बळजबरीने ओढून घेऊन पळ काढला.

त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपीपैकी दोघांना पकडण्यात यश आले असून एक जण ३० हजार रुपये घेऊन पळून गेला आहे. अन्नुकुमार अवदेश यादव व अमनकुमार जगन यादव (राहणार नयाटोला, जोराबगंज, तालुका कोढा, जिल्हा कटिहार, बिहार) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचा तिसरा साथीदार (नाव माहित नाही) पळून गेला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून सात लाखापैकी तीस हजार रुपये वगळता उर्वरित ६ लाख ७० हजार रुपये हस्तगत केले आहेत.

शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 928
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.