Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आळंदी प्रकरणावरून राजकारण न करण्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना सल्ला… तर धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी भाजपकडून टोळ्यांची निर्मिती; संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप
राजकारण

आळंदी प्रकरणावरून राजकारण न करण्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना सल्ला… तर धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी भाजपकडून टोळ्यांची निर्मिती; संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप

आळंदी प्रकरणावरून राजकारण तापले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात अशी घटना घडली, तेव्हा सर्वांनी त्यांना सांभाळून घेतले होते, त्यामुळे विरोधकांनी आळंदीतील प्रकरणावरून राजकारण करू नये, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

मंदिरात प्रवेश देण्याच्या कारणावरून रविवारी आळंदीमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. तर वारकऱ्यांवर कोणताही लाठीहल्ला करण्यात आलेला नाही, असे राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.

यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर चांगलीच टीका करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून संगमनेरमध्ये देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाने सरकार विरोधात सोमवारी सकाळी निषेध आंदोलन केले. आळंदी प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटण्याची चिन्हे निर्माण झाले असतानाच या मुद्द्यावरून आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. विरोधकांनी या मद्द्यावरून राजकारण करू नये.

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा यापेक्षा भयंकर घटना घडली होती. चेंगराचेंगरी झाली होती. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा अशी घटना घडू नये, याकरिता सरकारकडून काही सुचना करण्यात आलेल्या आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवीन बदल झाले आहेत. त्यामुळे नवीन जबाबदारी नवीन लोकांना देण्यात आल्याने ते सध्या उत्साहात आहेत, असा टोला लगावत जर का सरकारकडून काही आवाहन करण्यात आले असेल तर ते स्विकारले पाहिजे, असेही बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी भाजपकडून टोळ्यांची निर्मिती

याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर गंभीर आरोप केला आहे. धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी भाजपकडून टोळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. भाजप प्रत्येक ठिकाणी आपली राजकीय मस्ती दाखवत आहे. त्र्यंबकेश्वर, शेगाव, संगमेश्वर या ठिकाणी काही तरी धार्मिक वाद निर्माण करून वातावरण तापवण्याचे काम करण्यात आले आहे. भाजपने तयार केलेल्या टोळ्या या धार्मिक ठिकाणी घुसून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे काम करत आहे. तर सरकारला शासकीय पूजा करण्याचा हक्क नाही, असेही राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 319
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.