Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून म्हाळुंगी पुलासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर; इतरांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये : सोमेश्वर दिवटे
राजकारण

आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून म्हाळुंगी पुलासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर; इतरांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये : सोमेश्वर दिवटे

पुलाच्या प्रश्नावरून श्रेय वादाची लढाई रंगली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका व शहर हे देशासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे. म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आमदार थोरात यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेले पत्र व केलेल्या पाठपुराव्यातून या पुलासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे.

दिवटे म्हणाले, ऑक्टोबर 2022 मध्ये म्हाळुंगी नदीवरील पूर पाण्याने खचला होता. हा पूल घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, ओहरा महाविद्यालय, गंगामाई घाट, साईनगर या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचा होता. हा पूल खचल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने पुलाची पाहणी करून नागरिकांना दळणवळणाची व्यवस्था करून दिली.

या पूलाच्या उभारणी कामाकरता आमदार बाळासाहेब थोरात यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री महोदयांकडे पुलाच्या कामासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली व या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. यावरून याकामी हा निधी मिळाला आहे.

आमदार थोरात यांनी पाठपुरावा केल्याने हा निधी मिळत आहे. आ. थोरात यांना या निधीचे श्रेय जाऊ नये, यासाठी सत्तेचा वापर करून काही मंडळी या निधीमध्ये आडकाठी निर्माण करत होती. अगदी मंत्रालय पातळीवर जाऊन हा पूल होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात आले. ज्या लोकांना विकासाचे कोणतेही काम करता येत नाही. असे स्थानिक पुढारी विकासात आडकाठी निर्माण करतात.

त्यांच्या सांगण्यावरून इतरांनी चार-पाच महिने उशिराने नावापुरते पत्र दिले आहेत. फक्त पत्र देणे आणि पाठपुरावा करणे यामध्ये मोठा फरक असून हे काम फक्त आ. थोरात यांनीच केले आहे. हे सर्व जनतेला माहित आहे.

त्यामुळे इतरांनी पत्रकबाजी करून श्रेय घेण्याच्या केविलवाणा प्रयत्न करू नये, असे आवाहनही दिवटे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 457
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.