Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अलिखित करार मोडणाऱ्या थोरात व कोल्हेंचे पुढे काय करायचे ते ठरवू – महसूल मंत्री विखे पाटलांचा सूचक इशारा
राजकारण

अलिखित करार मोडणाऱ्या थोरात व कोल्हेंचे पुढे काय करायचे ते ठरवू – महसूल मंत्री विखे पाटलांचा सूचक इशारा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणत्याही नेत्याने दुसऱ्याच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित करार आहे. ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येत हा करार मोडला आहे. त्यांचे पुढे काय करायचे हे ठरवू, असा सूचक इशारा महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) मतदान होत आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनल विरोधात त्यांनी गणेशमध्ये परिवर्तनासाठी स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. या पॅनलच्या माध्यमातून आमदार थोरात आणि संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी विखे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.

या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्रमानंतर बोलताना विखे यांनी म्हटले आहे की, गणेश कारखाना निवडणुकीत उतरून थोरात व कोल्हे यांनी करार मोडला आहे. त्यामुळे त्यांचे पुढे काय करायचे हे ठरवू. यावेळी त्यांनी जिल्हा निर्मिती आणि भाजप अंतर्गत नाराजीवरही भाष्य केले.

भाजपमधील निष्ठावंत यांच्या नाराजीबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करू. पालकमंत्री म्हणून संघटनात्मक समन्वय साधण्याचे दायित्व माझ्यावर आहे. पक्ष संघटनेला बळ मिळण्यासाठी व शासकीय योजनांना गती मिळण्यासाठी “शासन आपल्या दारी” या योजनेची नगर शहरातील अंमलबजावणीची जबाबदारी शहरातील पदाधिकाऱ्यांवर दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.

श्रीरामपूरच्या आंदोलनात मला राजकारण दिसते…

जिल्हा विभाजन आणि शिर्डीमध्ये नव्याने मंजुरी देण्यात आलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय याचा काहीही संबंध नाही. जिल्हा निर्मितीचा हा निर्णय नाही. जिल्ह्यातील पाच-सात तालुक्यांसाठी शासकीय कामांच्या दृष्टीने सोयीचे ठरावे याकरिता शिर्डीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे निर्मिती केली आहे. ज्यांच्याकडे सात-आठ वर्षे महसूल मंत्रीपद होते. त्यांनी या सुविधेसाठी पाऊले उचलले नाही, विरोधात आंदोलन करत असलेल्यांनी त्यासाठी कधीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे श्रीरामपूरला सुरू असलेल्या या कार्यालयाविरोधातील आंदोलनात मला राजकारण दिसत आहे, असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 981
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.