Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप दिल्लीतून ठरणार; शिंदे, फडणवीस, पवार आजच जाणार दिल्लीला…
राजकारण

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप दिल्लीतून ठरणार; शिंदे, फडणवीस, पवार आजच जाणार दिल्लीला…

मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाने वाढविला भाजप समोरील तिढा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/07/2023Updated:12/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राज्याच्या मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होऊन आठवडा उलटला तरी सरकारचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खाते वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याने खाते वाटपाचा तिढा आता दिल्लीत सोडविला जाणार आहे. त्यासाठी शिंदे फडणवीस पवार दिल्लीला जाणार आहेत.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्र्यांना अद्याप कोणतेही खाते देण्यात आले नसल्याने सध्या हे सर्वजण बिन खात्याचाच कारभार हाकत आहे. वास्तविक नव्या मंत्र्यांना दोन दिवसात खातेवाटप जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील अंतर्गत कलहामुळे अद्याप खातेवाटप जाहीर होऊ शकले नाही.

मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याने खाते वाटपानंतर मंत्र्यांची संख्या ठरण्याची चिन्हे आहेत.

सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये भाजपकडे अर्थ खाते आहे. भाजपकडील अर्थ खाते अजित पवार यांना देण्यास शिंदे गटाचा विरोध आहे. तसेच गृह खाते फडणवीस यांच्याकडे कायम राहणार आहे. तर भाजपकडे म्हणजेच विखे यांच्याकडे असलेले महसूल खाते देखील काढून विखे पाटलांची नाराजी भाजपला परवडणारी नसल्याने भाजपची मोठी कोंडी झाली आहे. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडे असलेले महत्त्वपूर्ण खाते सोडण्यास शिंदे गट तयार नाही. आपल्या वाट्याचं एकही मंत्रीपद राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गट तयार नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांनाही वजनदार खाते हवे आहेत. यामुळे नव्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचे धर्मसंकट भाजपसमोर उभे राहिल्याने आता हा प्रश्न दिल्लीत सोडविला जाणार आहे.

खाते वाटपाचा तिढा दिल्ली दरबारात गेल्याने मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार आता दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहा यांच्यासोबतच्या बैठकीत खाते वाटपाचे कोणते सूत्र समोर येते, याबाबत लक्ष लागला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 423
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.