Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध
पत्रकारिता

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड ही महायुतीच्या सामूहिक ताकदीचे आणि विखे-जगतापांच्या 'मास्टरस्ट्रोक'चे उत्तम उदाहरण आहे, यात शंका नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/06/2026Updated:05/06/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संपादकीय

अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत जे नाट्य घडले, त्याने केवळ जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधून घेतले. ‘नॉट रिचेबल’ उमेदवार, थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा इशारा देणारे बंडखोर नेते आणि पडद्यामागे फिरलेली सूत्रे… हा सगळा घटनाक्रम एखाद्या थ्रिलर सिनेमालाही मागे टाकणारा होता. पण सरतेशेवटी, महायुतीचे (भाजप) अधिकृत उमेदवार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली. या संपूर्ण प्रकरणाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते; गरज असते ती योग्य वेळी अचूक ‘मास्टरस्ट्रोक’ मारण्याची, जी किमया आ. संग्राम जगताप आणि माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या जोडीने करून दाखवली.

अहिल्यानगरमध्ये सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने प्राजक्त तनपुरे यांचा मार्ग सुकर झाला असे वाटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दत्तात्रय पानसरे यांच्या अर्जाने अचानक ट्विस्ट आणला. दुपारी ३ वाजेची वेळ संपल्यानंतर पानसरेंनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून, “माझी खोटी सही करून अर्ज मागे घेण्यात आला आहे, माझा अर्ज कायम न ठेवल्यास मी आत्महत्या करेन,” असा थेट इशारा दिला. या एका विधानाने प्रशासकीय यंत्रणेसह संपूर्ण महायुतीच्या गोटात प्रचंड खळबळबळ उडवून दिली. एमआयएमचे नगरसेवक शाहबाज सय्यद यांनी त्यांचा माघारीचा अर्ज सादर केल्याचा दावा केला गेल्याने या वादाला आणखीनच राजकीय रंग आला.

जेव्हा महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तेव्हा पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी तात्काळ डॅमेज कंट्रोलची सूत्रे हाती घेतली. दुसरीकडे, आमदार संग्राम जगताप यांनी थेट पानसरे यांच्याशी संवाद साधत मध्यस्थी केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. रात्री नऊच्या सुमारास झालेल्या या बैठकीनंतर, “जे झाले ते केवळ गैरसमजातून झाले असून माझी कोणतीही तक्रार नाही,” असे स्पष्ट करत पानसरे यांनी माघार घेतली. यावरून हे स्पष्ट होते की, विखे-जगताप या पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी महायुतीचा धर्म पाळत एकत्र येऊन केलेले संकट निवारण अत्यंत अचूक होते.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पंकज आशिया यांनीही स्पष्ट केले की, अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी घेतलेले आक्षेप आणि शंका दूर झाल्या असून, सूचकाची सही योग्यच होती. त्यामुळे आता कोणताही कायदेशीर पेच उरलेला नाही. या संपूर्ण निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांची भूमिका केंद्रस्थानी राहिली. विधानपरिषेदेच्या या मतदारसंघातून त्यांचे वडील स्व. अरुण जगताप सलग दोनवेळा निवडून गेले होते. हा कौटुंबिक आणि राजकीय वारसा पाहता, सुरुवातीला संग्राम जगताप यांनी आपले बंधू व माजी जि.प. सदस्य सचिन जगताप यांच्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.

परंतु, बदललेली राजकीय परिस्थिती आणि महायुतीची निष्ठा लक्षात ठेवून त्यांनी वैयक्तिक आग्रह बाजूला ठेवला आणि सचिन जगताप यांचा अर्ज दाखल न करण्याचा मोठा निर्णय घेतला. केवळ स्वतःच्या कुटुंबाची माघारच नाही, तर बंडखोर पानसरे यांची समजूत काढून महायुतीचा उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात आ. संग्राम जगतापांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या बिनविरोध निवडीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांचे आभार मानले. नगरच्या राजकारणात विखे आणि जगताप हे दोन मोठे तट मानले जातात. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी दाखवलेली राजकीय प्रगल्भता आणि ‘मॅजिक’ आगामी काळातील मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते. प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड ही महायुतीच्या सामूहिक ताकदीचे आणि विखे-जगतापांच्या ‘मास्टरस्ट्रोक’चे उत्तम उदाहरण आहे, यात शंका नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 684
अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक प्राजक्त तनपुरे संग्राम जगताप संपादकीय सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराजवळील कोल्हार-घोटी रस्त्यावरील समनापूर फ्लॉवर मार्केट चौफुली येथील…

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.