Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा: संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या संघटनेकडून दबावतंत्राचा वापर; पोलीस प्रशासन आणि माध्यमांवर निशाणा
पत्रकारिता

न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा: संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या संघटनेकडून दबावतंत्राचा वापर; पोलीस प्रशासन आणि माध्यमांवर निशाणा

अशा परिस्थितीत डॉक्टर संघटना रुग्णांच्या हितासाठी पुढे येण्याऐवजी आरोपी डॉक्टरांच्या बचावासाठी संघटनात्मक बळाचा वापर करत असल्याचा आरोप होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2026Updated:15/04/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर

शहरातील नामांकित सोनांबेकर हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांवर रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाला आहे. मात्र, हा कायदेशीर तपास प्रक्रियेचा भाग असतानाही, डॉक्टरांच्या असोसिएशनच्या संगमनेर शाखेने संघटित होऊन पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी यांच्यावर सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नाशिकला हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली होती.

विशेष म्हणजे, चार महिने पाठपुरावा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर फिर्यादीला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी डॉ. अभिजीत कोरडे आणि डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु, न्यायालयाच्या आदेशानंतरही गुन्हा नोंदवण्यास आठ दिवसांचा विलंब झाल्याने पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवरही संशयाची सुई निर्माण झाली आहे.

या गंभीर प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांनी जनतेसमोर आणल्यानंतर डॉक्टरांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या सदस्यांनी एकत्र येत पोलीस अधिकारी आणि प्रशासनाला निवेदन दिले असून, आरोपी डॉक्टरांची ‘मीडिया ट्रायल’ केली जात असल्याचा दावा केला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्याऐवजी, माहिती दडपण्यासाठी माध्यमांना लक्ष्य करणे हा न्यायालयाचा अवमान आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे कारण आणि वैद्यकीय पुरावे समोर असताना देखील या प्रकरणात पोलिस यंत्रणेने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली यामागे अदृश्य दबाव तंत्र अवलंबले गेले असल्याचे चर्चा सुरू आहे. त्यामुळेच न्यायालयाचे आदेश आल्यानंतर देखील गुन्हा दाखल करण्यास आठ दिवसांचा कालावधी लागला. तर याप्रकरणी झालेल्या तपासाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. यातून हा दबाव किती खोलवर असेल याची कल्पना येते.

दुसरीकडे, या प्रकरणात आता राजकीय वळणही मिळाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असून, सोनांबेकर हॉस्पिटलने नगरपालिकेच्या जागेत केलेले अतिक्रमण हटवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर पालिकेने तातडीने कारवाई करत संबंधित अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. सरकारी जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करण्याच्या या कृतीवर मात्र डॉक्टर संघटनेने मौन बाळगल्याने त्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

रुग्णांची आर्थिक पिळवणूक आणि वैद्यकीय कायद्यांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी संगमनेर परिसरात वाढल्या आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेत असतानाच रुग्णांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर संघटना रुग्णांच्या हितासाठी पुढे येण्याऐवजी आरोपी डॉक्टरांच्या बचावासाठी संघटनात्मक बळाचा वापर करत असल्याचा आरोप होत आहे.

मेडिकल कौन्सिल ॲक्ट आणि महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टचे उल्लंघन करून चालणारा हा ‘काळाबाजार’ रोखण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणातील पोलिसांचा तपास काय वळण घेतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,003
डॉक्टर संघटना सोनांबेकर हॉस्पीटल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.