Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » झाकली मूठ… शिंदे-फडणवीस-पवार सरकार टिकविण्याची जबाबदारी ‘या’ १२ जणांच्या खांद्यावर
राजकारण

झाकली मूठ… शिंदे-फडणवीस-पवार सरकार टिकविण्याची जबाबदारी ‘या’ १२ जणांच्या खांद्यावर

आपसातील वाद बंद दाराआड सोडविण्यासाठी समिती काम करणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत असले तरी त्यांच्यात सर्व काही आलबेल नाही. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली असली तरी त्यांना अद्याप खाते वाटप करण्यात आले नाही तसेच मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यामुळे तिन्ही पक्षाचे आमदार नाराज असल्याने या पार्श्वभूमीवर आता महायुतीने तीन पक्षांच्या समन्वयासाठी १२ जणांच्या समन्वय समितीची स्थापन केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड हे या समितीचे प्रमुख समन्वयक आहेत.

खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आत्तापर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू आहे. चर्चेच्या फेऱ्या होत असल्या तरी देखील अंतिम निर्णय समोर येताना दिसत नाही. तसेच अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने, आपल्या वाट्याची मंत्रिपदे कमी होऊ नये त्यासाठी शिंदे गटाने थेट विरोधाची भूमिका घेतल्याने भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमधील नाराजी समोर येऊ लागली आहे.

महायुतीत खातेवाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच आमदार बच्चू कडू यांनी तीन इंजिनचे सरकार कधीही कोसळू शकते, असे वक्तव्य केले. गेल्या एका वर्षापूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. मात्र, आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. सत्तेत नवा वाटेकरी आल्याने शिंदे गट नाराज आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारमधील तीनही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एका समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीनही पक्षांमधील प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश या समितीत असणार आहे. बारा सदस्य असलेली ही समिती आमदारांमध्ये समन्वय साधण्याचे काम करेल.

यांचा आहे समितीत समावेश…

भाजपमध्ये प्रसाद लाड हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार यांचा समावेश आहे. तर शिवसेना (शिंदे गट) कडून मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे हे समन्वय प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांचा समन्वय समितीत समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 719
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.