Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी:  भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रवरा, आढळा आणि म्हाळुंगी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अमृतवाहिनी प्रवरा नदीला आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासीयांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पूजन करत आरती केली. प्रवरानदीच्या गंगामाई घाटावर हा सोहळा पार पडला. यावेळी प्रवरा नदीचे विधिवत जलपूजन आणि आरती करण्यात आली, तर म्हाळुंगी नदीला साडी-चोळी अर्पण करण्यात आली. या प्रसंगी डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्यासह गणेश मादास, अंबादास आडेप, लक्ष्मण बर्गे, अजित काकडे, प्रमिला अभंग, ॲड. मुन्ना…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करत उच्चांकी भाव दिला आहे. आता महाराष्ट्रात ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने, कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात ऊस वाढ कार्यक्रमांतर्गत नवीन AI वापरासाठी प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीबद्दल अधिक माहिती देताना घुले म्हणाले की, जागतिक स्तरावर शेती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढला आहे. ऊस शेतीमध्ये बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टने या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत कनोली येथील तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाहतुकीसाठी ३० हजार रुपयांची मागणी या तलाठ्याने केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये घेताना सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगर येथील एका ३९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार आणि त्यांचे मित्र शासनाच्या धोरणानुसार मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू वाहतुकीचं काम करत होते. संगमनेरचे तहसीलदार यांनी या कामासाठी त्यांना मंजुरी दिली होती. मात्र, तलाठी संतोष शेलार यांनी या कामासाठी ३०…

Read More

मुंबई: राज्य सरकारच्या गृह विभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असून मंगळवारी भारतीय पोलीस आणि राज्य पोलीस दलातील १८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेत पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केलेल्या सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन उपविभागांमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते. उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.  संगमनेर येथून बदली झाल्यानंतर सध्या ते दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (गट क्रं. ५) येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, मुंबई:  मीरा भाईंदरमध्ये आज होणाऱ्या मनसेच्या सर्वपक्षीय मोर्चापूर्वीच ठाणे-पालघरचे मनसे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेने या मोर्चाचे आयोजन केले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली असून, अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम होती. अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर मराठी बांधवांना मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. यामुळे काशिमीरा पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता…

Read More

मुंबई, 7 जुलै 2025: महाराष्ट्रात वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा लागू करण्याची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी आज विधान परिषदेत केली. नाशिक जिल्ह्यातील ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्याची आणि गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यात आढाव दांपत्याच्या निर्घृण हत्येची उदाहरणे देत तांबे यांनी या कायद्याची गरज अधोरेखित केली. आमदार तांबे यांनी सभागृहात सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मागील वर्षी ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यभर ऐरणीवर आला होता. त्यावेळीही 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वकील संरक्षणाबाबत कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोमवारी दुपारी १०,००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आमदार अमोल खताळ यांनी देखील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी निळवंड्यात येत असल्याने, धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या सांगवी, धांदरफळ, मंगळापूर, खांडगाव, कासारा दुमाला, संगमनेर खुर्द, निंबाळे, रायते, वाघापूर, खराडी, पिंपरणे, जोर्वे, रहिमपूर, कनोली आणि ओझर बंधारा परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आमदार खताळ यांनी आवाहन केले आहे की, नदीपात्रात असलेले जनावरे, पाण्याचे पंप, शेती…

Read More

अहिल्यानगर / अकोले, दि. ७ –  निळवंडे (उर्ध्व प्रवरा) धरणातून आज (सोमवार, दि. ७ जुलै) सकाळी ९ वाजता ६५७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्ग टप्याटप्याने वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अकोले, संगमनेर, ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात ठेवलेले जनावरं व तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरणे अथवा उशिरा हालचाल टाळावी, असे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी: महायुती सरकारने सुरू केलेल्या घरेलू कामगार योजनेअंतर्गत महिलांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात काही दलालांकडून लाभार्थींची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारींवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणताही योजनेसाठी पैसे देऊ नका, असे आवाहन करत, पैसे घेऊन लाभार्थींची आणि महायुती सरकारची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आमदार खताळ यांनी दिला. महायुती सरकारने घरेलू कामगार महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील लाभार्थी महिलांना आ. अमोल खताळ यांच्या उपस्थितीत साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रामभाऊ राहाणे, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, दिपाली वाव्हळ, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, पायल ताजणे, गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, गोकुळ दिघे, रेखा गलांडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज- पंढरपूर:  आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. पहाटे ३ वाजता ही महापूजा पार पडली, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा देखील उपस्थित होत्या. महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह आणि नाशिक येथील मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आणि दुग्धाभिषेक केला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच राज्याच्या विकासासाठी विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या वर्षी नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे कैलास…

Read More