Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकविरा फाऊंडेशनच्या साडेपाचशे युवा स्वयंसेवकांनी गणेश विसर्जनासाठी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका
सामाजिक

एकविरा फाऊंडेशनच्या साडेपाचशे युवा स्वयंसेवकांनी गणेश विसर्जनासाठी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका

यावर्षी, प्रवरा नदीतील पाण्याचा अंदाज घेऊन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने गणेश विसर्जनासाठी कन्हेअरची व्यवस्था केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –

संगमनेर शहरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. या गणेशोत्सवाचा समारोप एकविरा फाऊंडेशनच्या साडेपाचशे युवा स्वयंसेवकांनी केलेल्या मदतीमुळे अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झाला. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली या युवक-युवतींनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना मदत केली आणि प्रवरा नदीकाठची स्वच्छता करून निर्माल्य संकलन केले.

या उपक्रमासाठी एकविरा फाऊंडेशन आणि संगमनेर नगरपालिका यांनी संयुक्तपणे प्रवरा नदीकाठी विशेष व्यवस्था केली होती. यावेळी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही गणेश विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला. 

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साडेपाचशे युवक-युवतींनी नागरिकांना विसर्जनासाठी मदत केली आणि प्रवरा तसेच म्हाळुंगी नदीकाठी जमा झालेले निर्माल्य गोळा केले. पन्नास-पन्नासच्या गटांमध्ये विभागून या स्वयंसेवकांनी आलेल्या भाविकांना पुराची माहिती दिली आणि निर्माल्य योग्य ठिकाणी जमा करण्याचे आवाहन केले.

याबद्दल बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून एकविरा फाऊंडेशन हा उपक्रम राबवत आहे, तो खूप अभिमानास्पद आहे. यामध्ये अनेक तरुण स्वतःहून सहभागी होतात आणि नागरिकांना मदत करतात. यामुळे गणेश विसर्जन सुरक्षितपणे पार पडते.

आमदार सत्यजित तांबे यांनीही या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘एकविराचे सदस्य गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नदीकाठी सेवा देत आहेत. थोरात साखर कारखान्याने यांत्रिक मदत पुरवून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी मोठी मदत केली आहे.’

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाऊंडेशन महिला सबलीकरणासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही नेहमीच पुढे असते. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे नद्यांना भरपूर पाणी आहे. निर्माल्यमुळे होणारी अस्वच्छता आणि त्यातून वाढणारी रोगराई टाळण्यासाठी हे स्वच्छता अभियान राबवले जात आहे.

यावर्षी, प्रवरा नदीतील पाण्याचा अंदाज घेऊन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने गणेश विसर्जनासाठी कन्हेअरची व्यवस्था केली. यामुळे भाविकांना गणपतीचे विसर्जन करणे सोपे आणि सुरक्षित झाले. नदीकाठी सुरक्षा रक्षक, पोहणारे तरुण आणि आरतीची व्यवस्थाही करण्यात आली होती. या संपूर्ण कामासाठी संगमनेर नगरपालिकेनेही मोठे सहकार्य केले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 394
एकवीरा फाउंडेशन गणेश विसर्जन मिरवणूक जयश्री थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

By Annant Ppangarkar16/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. दिवसभरात एखादी गोड…

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.