Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाटबंधारे वसाहतीतील पडक्या खोलीत दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
गुन्हेगारी

पाटबंधारे वसाहतीतील पडक्या खोलीत दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील तपासातूनच या घटनेमागील खरे कारण समोर येईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर – 

गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा कुजलेला मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत आढळला आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात शोककळा पसरली असून, मोठी खळबळ उडाली आहे.

महेश डोरले (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १ येथील रहिवासी होता. ५ जुलैपासून महेश अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर, दोन महिन्यांनी त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील एका पडक्या खोलीत आढळला.

गणेश विसर्जन सुरू असतानाच ही धक्कादायक घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे यांच्यासह पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. मृतदेह इतका कुजलेल्या अवस्थेत होता की, तो ओळखणे पोलिसांसाठीही अत्यंत अवघड होते. तब्बल चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवली. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने शीर धडापासून वेगळे झाले होते.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे तसेच शीर धडापासून वेगळे झाल्याने या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, ही आत्महत्या की घातपात याचाही तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे महेशच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील तपासातूनच या घटनेमागील खरे कारण समोर येईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,080
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.