Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गणपती विसर्जन मिरवणुकीत राज्यात १८ जणांचा मृत्यू
श्रद्धांजली

गणपती विसर्जन मिरवणुकीत राज्यात १८ जणांचा मृत्यू

गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या या दुर्दैवी घटनांमुळे राज्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 8, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई- 

राज्यात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात पार पडल्या. मात्र, काही ठिकाणी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या दुर्दैवी घटनांमुळे १८ जणांचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये तिघांचा मृत्यू- नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. आनंदवल्ली येथे गोदावरी नदीत प्रवीण शांताराम चव्हाण या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, बोरगड येथे चंदर नथू माळेकर (वय २९) यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नर शहरालगतच्या सरदवाडी धरणातही ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (वय ४०) यांचा बुडून मृत्यू झाला.

धुळे, मीरा भाईंदर आणि मुंबईत दुर्घटना- धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जन करून दुचाकीवरून परतणाऱ्या शुभम सांगवी या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मीरा भाईंदरमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मुंबईच्या साकीनाका परिसरातही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.

नांदेड, शहापूर आणि अमरावतीतही घटना- नांदेड जिल्ह्यात गाडेगाव शिवारातील आसना नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, शहापूर तालुक्यात तीन जणांचा तर अमरावतीमध्ये विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या या दुर्दैवी घटनांमुळे राज्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 418
गणेश विसर्जन मिरवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

खाणीतील पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा अंत; संगमनेर तालुक्यातील तिगाववर शोककळा

May 23, 2026

उरण तालुका रिक्षा युनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल पुरो (अण्णा) यांचे देहावसान

April 28, 2026

दैनिक ‘प्रवरातीर’ परिवारावर शोककळा; ज्येष्ठ मार्गदर्शक अनिता ठाकूर यांचे निधन

March 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

अहिल्यानगर: श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून पोलीस अंमलदार शंकर चौधरी यांना अहिल्यानगरचे…

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.