Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान मोठा गोंधळ उडाला. कॉकरोच जनता पार्टीतर्फे (CJP) पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी व तरुण रस्त्यावर उतरले होते. संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलकांनी सुरक्षा यंत्रणांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संसद मार्ग आणि जंतरमंतर परिसरात जोरदार लाठीचार्ज केला. हाय-सिक्युरिटी झोनमध्ये जमा झालेल्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या तीव्र झटापटीत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. रेल भवनजवळ पोहोचलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या सर्व तणावपूर्ण परिस्थितीमुळे संसदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी करणे, संवाद साधणे आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हीच खरी लोकशाहीची ओळख असते. मात्र, आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणे हे स्पष्टपणे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर बळाचा वापर केला जात असेल आणि त्यांचे मतभेद दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाहीचा नाही तर हुकूमशाहीचा मार्ग आहे. सोनम वांगचुक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मन प्रसन्न राहील आणि आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची योग्य काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. व्यापारात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला आनंद मिळेल. कौटुंबिक वातावरणात सलोखा राहील. प्रवासाचे योग येत आहेत, जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. मिथुन – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, परंतु…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी रुग्णालय प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने यात सुधारणा न केल्यास शिवसेनेच्या वतीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयासमोर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विनोद सूर्यवंशी हे आपल्या लहान बाळाला अँटी रेबीज लसीकरणासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता, तेथे आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर न्यायालयीन कामकाजाचे कारण सांगून गैरहजर होते, यामुळे अनेक पालक आपल्या आजारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मोहसीन शेख | संगमनेर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या, हातगाड्या आणि लहान दुकाने क्षणाचाही विलंब न लावता जमीनदोस्त केली. वर्षानुवर्षे कष्टाने उभा केलेला आपला उदरनिर्वाहाचा मार्ग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून अनेक गरीब व्यावसायिक भावनिक झाले होते. या कारवाईदरम्यान संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नुकतीच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम अत्यंत पक्षपाती आणि निवडक पद्धतीने राबवली गेल्याची भावना संगमनेरकरांमध्ये निर्माण झाली असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप…
प्रवीण पुरो अनेक वर्षांच्या ब्रिटिश गुलामगिरीतून बाहेर पडलेला भारत आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना, या देशाच्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बुजुर्ग शास्त्रज्ञाला लोकशाहीच्या बचावार्थ आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होय. दिल्लीतील मध्यवर्ती सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या असंख्य घटना या देशात घडूनही यंत्रणा मख्ख बनल्या आहेत. मुसोलिनीच्या सत्तेला जाब विचारणे त्याला अव्यवहारी वाटत होते. सत्तेविरोधात आंदोलन केले की ते दडपून टाकण्याची पद्धत होती; तीच पद्धत आता मध्यवर्ती सरकारने अवलंबलेली दिसते. मुसोलिनीप्रमाणेच मोदींनाही प्रश्न नकोसे झाले आहेत. दिल्लीत होणारी सरकारविरोधातील आंदोलने चिरडून टाकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा उघड वापर करून कुठल्याही परिस्थितीत आंदोलकांना दाद द्यायची नाही,…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येणारा ठरेल. तुमच्या गुणांमुळे आणि प्रतिभेने तुम्ही लोकांना प्रभावित करू शकाल, ज्यामुळे समाजात तुमचे वर्तुळ वाढेल आणि महत्त्वाचे संबंध प्रस्थापित होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे आणि कार्यशैलीचे कौतुक होईल. आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास, जर तुम्ही हुशारीने निर्णय घेतले तर तुम्हाला अतिरिक्त धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळण्याची उत्तम चिन्हे आहेत, मात्र भागीदारीच्या कामात किंवा सहकाऱ्यांशी बोलताना ताणतणाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. मानसिक पातळीवर आज काहीशी चिंतेची किंवा तणावाची भावना राहू शकते, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खुश…
संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, गेल्या दहा ते बारा दिवसांत सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २५,०२४.८ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत एकूण २५ हजार ४.८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कल सोयाबीन आणि मका लागवडीकडे असून, बाजरीच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे. निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळाल्याने काही भागात ऊस लागवडही वाढत आहे, तर बदलत्या वातावरणामुळे शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे वळत आहेत. सध्या तालुक्यात सोयाबीन ८,९४७.१ हेक्टर, मका ९,३४६ हेक्टर, बाजरी ३,६२५.९ हेक्टर, कापूस १,५९१ हेक्टर, भुईमूग…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संगमनेर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाने नव्या आणि जुन्या फळीचा मेळ घालत आगामी काळासाठी आपली नवी टीम मैदानात उतरवली आहे. या नव्या नियुक्त्यांनुसार, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी अजय नारायण फटांगरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर, शहराध्यक्ष म्हणून सोमेश्वर सूर्यभान दिवटे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. याचसोबत पक्षाचा लढाऊ चेहरा म्हणून ओळखले जाणारे अमोल भारत शेलकर यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…
नवी दिल्ली: देशातील विविध परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या उपोषणाचा आज २१वा दिवस होता. जंतरमंतरवर प्रचंड गोंधळ आणि लाठीचार्जचे आरोप – पहाटेच्या वेळी जंतरमंतर मैदानाभोवती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस जेव्हा वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यासाठी आले, तेव्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र वाद व शाब्दिक चकमक झाली. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियाद्वारे असा आरोप केला आहे की, आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि…
