Author: अनंत पांगारकर
नवी दिल्ली: देशातील विविध परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या उपोषणाचा आज २१वा दिवस होता. जंतरमंतरवर प्रचंड गोंधळ आणि लाठीचार्जचे आरोप – पहाटेच्या वेळी जंतरमंतर मैदानाभोवती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस जेव्हा वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यासाठी आले, तेव्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र वाद व शाब्दिक चकमक झाली. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियाद्वारे असा आरोप केला आहे की, आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास वाढल्याने नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील आणि जुने कर्ज फेडण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जातील. परंतु, इतरांच्या खाजगी गोष्टींमध्ये विनाकारण हस्तक्षेप करणे टाळलेले बरे राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. वृषभ – कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला अपेक्षित प्रगती पाहायला मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला मोठा आनंद मिळेल आणि दिवस प्रसन्न राहील. घेतलेली कामे तुम्ही अत्यंत जबाबदारीने आणि कौशल्याने पूर्ण कराल, ज्यामुळे वरिष्ठ आनंदी राहतील. आर्थिक आवक चांगली असली तरी वाढत्या खर्चावर थोडे…
प्रवीण पुरो | मुंबई: राज्यात डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी महाराष्ट्रातील हजारो शाळा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘यू डायस २०२५-२६’ च्या अहवालातून समोर आले आहे. राज्यातील एकूण १ लाख ८ हजार १३९ शाळा, २ कोटी १६ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि साडेसात लाख शिक्षकांच्या या अथांग शैक्षणिक परिघात अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. सरासरी एका शाळेत २०० विद्यार्थी आणि सात शिक्षक कार्यरत असतानाही, ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्था पुरती कोलमडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. डिजिटल शिक्षणाचा पाया असलेल्या वीज आणि इंटरनेटची राज्यात प्रचंड दुरवस्था…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले: अकोले तालुक्यातील कोतुळ गावात संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई करत ६ लाख ११ हजार २३० रुपयांचा बेकायदेशीर गुटखा, सुगंधित तंबाखू आणि एक कार जप्त केली आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. डॉ. कुणाल सोनवणे यांना कोतुळ गावातील रहिवासी शोएब शावीद काझी याने आपल्या घराजवळ एका स्विफ्ट कारमध्ये गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी उपविभागीय कार्यालयाच्या पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने पंचांसमक्ष…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायी आणि प्रगतीकारक ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे किंवा रखडलेले पैसे आज परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता आणि त्यात यशही मिळेल. घाईघाईत किंवा कोणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवून निर्णय घेणे टाळा, तसेच बोलताना संयम बाळगा कारण वाद होण्याची शक्यता आहे. वृषभ – आज तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याचा कमालीचा उत्साह दिसून येईल. तुमची मधुर वाणी आणि नम्र स्वभाव यामुळे तुम्ही इतरांची मने जिंकून घ्याल, ज्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीला भुलून जिओ कंपनीचा पेट्रोल पंप आणि त्याचा परवाना मिळवण्याच्या नादात अहिल्यानगरमधील एका व्यावसायिकाला तब्बल ८४ लाख ५३ हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जामखेड येथील कृषी सेवा केंद्र चालक उदय गुलाबराव शिंदे यांनी या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी दोन अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी फेसबुकवर सौरभ अग्रवाल याने टाकलेली पेट्रोल पंपाच्या डीलरशिपची जाहिरात पाहिली होती. तेथील लिंकवर प्रतिसाद दिल्यानंतर सौरभ अग्रवाल आणि स्वतःला ‘शिंदे इंजिनिअर’ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. या भामट्यांनी प्रोसेसिंग फी आणि इतर विविध मंजुरींच्या नावाखाली ऑक्टोबर…
संगमनेर: “अध्यात्मिक श्रद्धेपोटी आपण ज्याप्रमाणे पवित्र मंदिरांना दान देतो, त्याच धर्तीवर उद्याचा सुजाण भारतीय नागरिक घडवणाऱ्या जीवन शिक्षण मंदिरांना म्हणजेच शाळांनाही सढळ हस्ते दान दिले पाहिजे. जर ही ज्ञानमंदिरे भक्कमपणे उभी राहिली, तरच आपला देश खऱ्या अर्थाने सामर्थ्यसंपन्न बनेल,” असे प्रतिपादन संगमनेर येथील प्रसिद्ध अंबिका मुळव्याध व भगंदर क्लिनिकचे संचालक डॉ. दत्तात्रय आहेर यांनी केले. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी (गणोरे) येथे आयोजित वृक्षारोपण व देणगी प्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर रोटरी क्लबचे संचालक सुनील कडलग, डॉ. रेखा आहेर, सरपंच संतोष आंबरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या रोटरी वर्ष २०२६–२७ साठी रो. आनंद किसन हासे यांची असिस्टंट गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा, रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ अकोले सेंट्रल या तीन क्लबच्या मार्गदर्शन व समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रोटरी जिल्हा ३१३२ चे प्रांतपाल रो. जयेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आनंद हासे हे या तीनही क्लबचे नेतृत्व विकास, वार्षिक नियोजन, सदस्यवाढ, द रोटरी फाउंडेशन, प्रभावी सेवा प्रकल्प तसेच जिल्ह्याच्या उद्दिष्टांशी सुसंगत कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. हासे हे रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे माजी अध्यक्ष असून त्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: मालपाणी हेल्थ क्लबचा युवा जलतरणपटू समरवीर देशमुख याने जलतरणातील राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत चमकदार कामगिरी करत संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या घवघवीत यशामुळे त्याला पुण्यातील बालेवाडी येथील ‘श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल क्रीडा प्रबोधिनी’मध्ये थेट इयत्ता आठवीच्या वर्गात सन्मानपूर्वक प्रवेश मिळाला आहे. समरवीरने आपल्या गुणवत्तेच्या बळावर मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. समरवीरच्या मातोश्री रेश्मा देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, समरवीर मागील पाच वर्षांपासून मालपाणी हेल्थ क्लबमध्ये राष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक अॅड. सदाशिवराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा खडतर सराव करत आहे. तसेच त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी हेल्थ क्लबचे प्रशिक्षक सचिन क्षीरसागर यांनीही त्याला विशेष…
आजचे राशिभविष्य मेष – आजच्या दिवशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा समाजात मोठा प्रभाव पडेल. सार्वजनिक जीवनात मान, सन्मान आणि नवीन प्रतिष्ठा लाभण्याचे योग आहेत. रखडलेली कामे मार्गी लागतील, परंतु कामाच्या निमित्ताने धावपळ वाढू शकते. स्वतःमधील कलागुणांचा वापर करण्यासाठी आणि नवीन विचारसरणीला वाव देण्यासाठी हा काळ उत्तम आहे. वृषभ – तुमची जिद्द आणि चिकाटी आजच्या दिवशी खूप वाढेल, ज्यामुळे काही कठीण कामे तुम्ही धैर्याने पूर्ण कराल. प्रभावशाली व्यक्तींशी झालेली भेट भविष्यात फायदेशीर ठरू शकते, मात्र सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे हिताचे ठरेल. मिथुन – व्यवसायात आज मोठी उलाढाल होण्याची शक्यता असून आर्थिक बाजू बळकट होईल. कौटुंबिक जीवनात सुख आणि सुसंवाद टिकून…
