Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: केंद्रातील हुकूमशाही आणि गर्विष्ठ सरकारला देशातील तरुणाईने पुरते नमवले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्यानंतर पेटून उठलेल्या या संघर्षापुढे झुकत केंद्र सरकारला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागला. या ऐतिहासिक यशाचे संगमनेरमध्ये काँग्रेससह सर्व समविचारी व पुरोगामी पक्षांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी व केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी आता संपूर्ण तरुणाई सज्ज झाली आहे, असा घणाघाती इशारा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला. दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या २८ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर अभूतपूर्व यश मिळाले. संगमनेर बस स्थानक परिसरात शहर व तालुका युवक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा बनाव करत बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या एका अट्टल टोळीचा आळेफाटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सतर्क नागरिकांच्या मदतीने दोन महिलांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या मागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. संतवाडी शिवारात राहणाऱ्या भामाबाई सोनभाऊ निमसे यांचे घर बंद असल्याचे पाहून ३ महिला व १ पुरुष अशा चार जणांच्या टोळीने दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील जुनी तांब्या-पितळची भांडी आणि पाण्याचा बंब त्यांनी आणलेल्या पोत्यात…
आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवशी आर्थिक नियोजनावर भर देणे आवश्यक ठरेल. अनपेक्षित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु व्यावसायिक क्षेत्रातील नवीन योजनांमुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील आणि मुलांकडून शुभवार्ता मिळतील. वृषभ – कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अतिशय फायदेशीर ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन मालमत्ता किंवा गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या. आर्थिक आवक स्थिर असली तरी विनाकारण खर्च करणे टाळा. मिथुन – आज सहजीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. अनावश्यक खरेदी टाळून बजेटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कर्क – व्यावसायिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर पोलिसांच्या वतीने शनिवारी, (२५ जुलै) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारींसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. या तक्रार निवारण दिनी श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे होणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गोवंश तस्करी आणि कत्तलीच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत कठोर कायदेशीर भूमिका घेतली आहे. शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणातील आरोपींवर आता अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) हे अतिरिक्त वाढीव कलम लावून कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री संगमनेर-पुणे रस्त्यावर देवीगल्लीच्या पाठीमागे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या ‘छोटा हत्ती’ (MH 14 CD 0839) वाहनाची तपासणी करण्यात आली होती. त्यात सुमारे तीन लाख रुपये किमतीचे ५०० किलो गोवंश जातीच्या जनावराचे मांस आढळून आले…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपणासाठी काहीसा वेगळा आणि गूढ गोष्टींची आवड निर्माण करणारा ठरेल. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि घाईघाईत निर्णय घेणे टाळा. व्यवसायात अडकलेली कामे पुढे सरकतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आज विशेष आनंद आणि सुख लाभेल. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाच्या कामांमध्ये अत्यंत लाभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि एखादा छोटा प्रवास संभवतो. मिथुन – आजचा दिवस अत्यंत शुभ फलदायी राहील. घरात आनंदी वातावरण असेल आणि रखडलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण झाल्याने मनात उत्साह राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि धनलाभाचे चांगले योग आहेत. कर्क – शैक्षणिक आणि कला क्षेत्राशी जोडलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने रविवारी, (२६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत भव्य आणि ऐतिहासिक सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल २५ हजार भाविकांच्या एकत्र येण्यातून हा अभूतपूर्व आध्यात्मिक सोहळा साकारणार असून, परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या विशेष पुढाकारातून आणि मार्गदर्शनातून या अभिनव उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून अविरत कार्यरत असलेल्या या केंद्राचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. सुरुवातीच्या काळात परिसरातील विरळ…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस नव्या संधी आणि उत्साहाने भरलेला असेल. व्यवसायात केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. थकीत रक्कम परत मिळून आर्थिक दिलासा मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील आणि जुने वाद मिटतील. वृषभ – आजच्या दिवशी संयमाने काम करण्याची गरज आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमची काम करण्याची शैली सर्वांना आवडेल. कौटुंबिक अडचणींवर चर्चेतून मार्ग निघेल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. मिथुन – आज नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा कामाच्या ठिकाणी गौरव केला जाईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. कर्क – मालमत्तेचे किंवा जागेचे जुने वाद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिक, युवक, महिला व सर्व समविचारी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पंतप्रधान, गृहमंत्री व शिक्षण मंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी घरात सरकारविरोधी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह समविचारी, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असं विद्यार्थी व संगमनेरकर मोठ्या संख्येने मशाल मोर्चात सहभागी झाले होते. हा विराट मशाल मोर्चा संगमनेर बस स्थानकापासून सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चावडी मार्गे हा मोर्चा महात्मा फुले स्मारकापर्यंत पोहोचला. यावेळी झालेल्या सभेत बोलताना…
विशेष प्रतिनिधी / मुंबई NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. दिल्लीतील या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी २४ जुलै रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थासह (शिवाजी पार्क) संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या एकत्रित आंदोलनात आघाडीचे सर्व प्रमुख घटकपक्ष पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याने राज्यभरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना झालेल्या बेदम मारहाणीचे फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर पसरल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाठीमारात मुंबई, पुणे आणि नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक मराठी तरुण जखमी झाले…
