Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य आणि त्याग दाखवला आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या सैनिकांमुळेच देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित आणि शांत झोपू शकतो. पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी कारगिल युद्धात मिळवलेला विजय हा आपल्या इतिहासातील अत्यंत सुवर्ण आणि महत्त्वाचा अध्याय आहे. या पराक्रमाचे आणि हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण कायम राहावे, यासाठी संगमनेरमध्ये राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक उभारले जाईल. या स्मारकासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेल्हाळे परिसरातील ४२ गुंठे जागा देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री…
प्रवीण पुरो दिल्लीच्या जंतरमंतरवर जमलेल्या देशातील युवा पिढीने नरेंद्र मोदींच्या सरकारची घमेंड पुरती मोडली आहे. “कुठल्याही परिस्थितीत राजीनामा नाही म्हणजे नाही,” असा सूर आवळून बसलेल्या मोदींना अखेर माघार घ्यावी लागली. ती त्यांची मजबुरी होती. ‘जेन झी’ला कस्पटासमान वागवणाऱ्या सरकारवर नामुष्की आली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात लाडके मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपद सोडावे लागले. प्रधान यांनी पद सोडले नसते तर देशभर हल्लाबोल झाला असता, याची जाणीव मोदी आणि अमित शहांना झाली हे बरे झाले. भक्तांच्या खोट्या पाठिंब्यावर या दोघांची मदार असते. भक्त काल आणि परवाही सत्तेची लाली टिपत होते. प्रधानांनी राजीनामा दिला तरीही भक्तांची जात ४० पैशांचे काम इतबाराने करत होती.…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अतिशय उत्तमरीत्या पार पाडाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. वृषभ – आज आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. व्यापाऱ्यांना नवीन योजनेतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखून चालल्यास मनःशांती लाभेल. दिवसभरात एखादी गोड बातमी ऐकायला मिळू शकते. मिथुन – आज कला आणि निर्मितीक्षम कामांमध्ये तुमची आवड वाढेल. नोकरदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. निरर्थक चिंतांपासून दूर राहून सकारात्मक विचारांवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: केंद्रातील हुकूमशाही आणि गर्विष्ठ सरकारला देशातील तरुणाईने पुरते नमवले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्यानंतर पेटून उठलेल्या या संघर्षापुढे झुकत केंद्र सरकारला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागला. या ऐतिहासिक यशाचे संगमनेरमध्ये काँग्रेससह सर्व समविचारी व पुरोगामी पक्षांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी व केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी आता संपूर्ण तरुणाई सज्ज झाली आहे, असा घणाघाती इशारा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला. दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या २८ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर अभूतपूर्व यश मिळाले. संगमनेर बस स्थानक परिसरात शहर व तालुका युवक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा बनाव करत बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या एका अट्टल टोळीचा आळेफाटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सतर्क नागरिकांच्या मदतीने दोन महिलांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या मागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. संतवाडी शिवारात राहणाऱ्या भामाबाई सोनभाऊ निमसे यांचे घर बंद असल्याचे पाहून ३ महिला व १ पुरुष अशा चार जणांच्या टोळीने दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील जुनी तांब्या-पितळची भांडी आणि पाण्याचा बंब त्यांनी आणलेल्या पोत्यात…
आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवशी आर्थिक नियोजनावर भर देणे आवश्यक ठरेल. अनपेक्षित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु व्यावसायिक क्षेत्रातील नवीन योजनांमुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील आणि मुलांकडून शुभवार्ता मिळतील. वृषभ – कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अतिशय फायदेशीर ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन मालमत्ता किंवा गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या. आर्थिक आवक स्थिर असली तरी विनाकारण खर्च करणे टाळा. मिथुन – आज सहजीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. अनावश्यक खरेदी टाळून बजेटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कर्क – व्यावसायिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर पोलिसांच्या वतीने शनिवारी, (२५ जुलै) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारींसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. या तक्रार निवारण दिनी श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे होणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गोवंश तस्करी आणि कत्तलीच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत कठोर कायदेशीर भूमिका घेतली आहे. शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणातील आरोपींवर आता अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) हे अतिरिक्त वाढीव कलम लावून कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री संगमनेर-पुणे रस्त्यावर देवीगल्लीच्या पाठीमागे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या ‘छोटा हत्ती’ (MH 14 CD 0839) वाहनाची तपासणी करण्यात आली होती. त्यात सुमारे तीन लाख रुपये किमतीचे ५०० किलो गोवंश जातीच्या जनावराचे मांस आढळून आले…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपणासाठी काहीसा वेगळा आणि गूढ गोष्टींची आवड निर्माण करणारा ठरेल. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि घाईघाईत निर्णय घेणे टाळा. व्यवसायात अडकलेली कामे पुढे सरकतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आज विशेष आनंद आणि सुख लाभेल. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाच्या कामांमध्ये अत्यंत लाभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि एखादा छोटा प्रवास संभवतो. मिथुन – आजचा दिवस अत्यंत शुभ फलदायी राहील. घरात आनंदी वातावरण असेल आणि रखडलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण झाल्याने मनात उत्साह राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि धनलाभाचे चांगले योग आहेत. कर्क – शैक्षणिक आणि कला क्षेत्राशी जोडलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने रविवारी, (२६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत भव्य आणि ऐतिहासिक सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल २५ हजार भाविकांच्या एकत्र येण्यातून हा अभूतपूर्व आध्यात्मिक सोहळा साकारणार असून, परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या विशेष पुढाकारातून आणि मार्गदर्शनातून या अभिनव उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून अविरत कार्यरत असलेल्या या केंद्राचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. सुरुवातीच्या काळात परिसरातील विरळ…
