Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौणखनिज चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निलंबित करण्यात आले आहे. गौणखनिज चोरी व अवैध वाहतुकीवर रोख लावण्यात निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा दाखवल्याचा ठपका ठेवत महसूल व वन विभागाने हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात तीव्र खळबळ उडाली असून, चौकशीअंती आणखी एका तहसीलदारावर कारवाई प्रस्तावित असल्याची चर्चा रंगल्याने इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. हे संपूर्ण प्रकरण सावखेडा येथील वाळू घाटाशी संबंधित आहे. २६ मे रोजी या घाटावर नियमबाह्य पद्धतीने मशीनद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू असल्याचे महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या संगमनेरच्या भूमिपुत्रांनी संगमनेरमार्गे पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सुरु करण्याच्या मागणीसाठी कंबर कसली आहे. या मागणीला व्यापक पाठिंबा मिळवून देण्यासाठी पुणे शहरात लवकरच एका विशेष ‘पुणे–नाशिक रेल्वे परिषदेचे’ आयोजन केले जाणार आहे. पुणे आणि नाशिकदरम्यानचा हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशाच्या दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. हा रेल्वे मार्ग संगमनेरला जोडल्यास परिसरातील नागरिकांना दोन्ही प्रमुख शहरांशी जलद व आधुनिक रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी राहणाऱ्या संगमनेरकरांना एकाच व्यासपीठावर आणून या हक्काच्या मागणीसाठी भक्कम पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या परिषदेमध्ये प्रकल्पाची सद्यस्थिती, संगमनेरमार्गे रेल्वेची तांत्रिक व व्यावहारिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन साकूर: संगमनेर तालुक्यातील मांडवे आणि बिरेवाडी गावांच्या हद्दीवर नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पोल्ट्री शेडवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बिरेवाडी येथील संतोष माणिक गळंगे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज शुक्रवारपासून (१४ ऑगस्ट) बिरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा त्यांनी दिला आहे. संतोष गळंगे यांनी मांडवे बुद्रुक हद्दीत आपल्या घरापासून अवघ्या ५० फुटांवर असलेल्या अनधिकृत पोल्ट्रीवर कारवाई करण्याची आणि बिरेवाडी हद्दीतील दोन पोल्ट्रींची ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ (एनओसी) रद्द करून त्या सीलबंद करण्याची प्रमुख मागणी लावून धरली आहे. परिसरात तीन पोल्ट्री शेड कार्यरत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी म्हटले आहे. यामुळे शासन स्तरावर लावणीला लोकनृत्याचा दर्जा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेच्या वतीने पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी संगमनेर नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार दळवी, प्रमुख कार्यवाह विशाल कदम, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, द्वारकानाथ जाधव, दत्ता बटवाल आदी मान्यवर उपस्थित होते सत्कार प्रसंगी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार दळवी यांनी राज्यपाल कार्यालयामार्फत गेल्या २१ वर्षांपासून आयोजित होणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’ या अंतरविद्यापीठ युवक महोत्सवात…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि पूर्वी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल, परंतु रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि आर्थिक बाबतीत कोणताही घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. वृषभ – आज आर्थिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल आहे. प्रदीर्घ काळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभाचे योग बनत आहेत. कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. नोकरी व व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, फक्त विचारपूर्वक भांडवल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मिथुन – आज तुमची सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता उच्च शिखरावर असेल.…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबींमध्ये लाभ होण्याचे योग आहेत, परंतु अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि सलोखा राहील. आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आज आपल्याला धैर्याने आणि संयमाने काम करण्याची गरज आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्यास जुने मतभेद मिटतील. संध्याकाळी एखादी चांगली बातमी कानावर पडण्याची शक्यता आहे. मिथुन – आजचा दिवस सर्जनशीलता आणि नवीन कल्पना राबवण्यासाठी उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने १५ आणि १६ ऑगस्ट रोजी अकोले तालुक्यातील भंडारदरा व परिसरातील पर्यटन स्थळांवर होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रंधा फाटा ते भंडारदरा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. स्वातंत्र्यदिन आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार व रविवारी पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे आणि अहिल्यानगर येथून मोठ्या संख्येने पर्यटक भंडारदरा, रंधा धबधबा, कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड व कोकण कडा परिसरात येण्याची शक्यता आहे. या परिसरातील रस्ते अरुंद असून काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दरवर्षी नवनवीन आणि अभिनव उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या संगमनेर येथील प्रसिद्ध ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’ने यंदाच्या गणेशोत्सवात ‘डिजिटल इंडिया’ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कागदी पावती पुस्तकांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्गणी संकलनासाठी ‘डिजिटल पावती पुस्तक’ वापरणारे बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळ हे संगमनेर शहरातील पहिलेच मंडळ ठरले आहे. गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कागदी पावत्या छापल्या जातात. मात्र, डिजिटल युगाची गरज ओळखून मंडळाचे मार्गदर्शक व नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या संकल्पनेतून हे विशेष मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. आता मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी आणि दुकानांमध्ये जाताना पावती पुस्तक न नेता मोबाईलमधील ॲपद्वारे वर्गणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरमध्ये अवैध दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठे कारवाई केली. संबंधित ठिकाणी सातत्याने कारवाया झाल्याने आरोपींच्या आस्थापना कायमस्वरूपी सील करण्याची मागणी दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. संगमनेर शहरात गोवा बनावटीची व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरोधात संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत ‘रॉयल इम्पॅक्ट’ व्हिस्कीचे ३४ बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट दारू बनवण्याचे साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाने शिवाजी नगर, वडजे मळा परिसरातील…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता असून जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण किंवा ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरेल. वृषभ – आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे नियोजनबद्ध रीतीने काम करणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि विनाकारण खर्च करणे टाळा. कौटुंबिक जीवनात लहान-सहान कारणांवरून…
