Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्ष लोगोचे अनावरण; शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबविणार सहकार, कृषी व शैक्षणिक उपक्रम
सामाजिक

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्ष लोगोचे अनावरण; शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबविणार सहकार, कृषी व शैक्षणिक उपक्रम

संगमनेरकरांनाही कल्पना मांडता येणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/08/2023Updated:07/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – सहकारातील दीपस्तंभ थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती शताब्दी निमित्त वर्षभरात सहकार, कृषी व शैक्षणिक क्रांतीचा महोत्सव साजरा होणार असून या निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब थोरात यांचे छायाचित्र असलेल्या शताब्दी महोत्सवाचा लोगोचे अनावरण करण्यात आले आहे.

यांनी केले अनावरण आणि यांची होती उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, शंकर खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, आर. बी राहणे, निखिल पापडेजा, अर्चना बालोडे, सुनंदा जोर्वेकर, निर्मला गुंजाळ, संतोष हासे, सुधाकर जोशी, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अनिल शिंदे, बाबुराव गवांदे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील व संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार हा आपल्या जीवनाचा मार्ग निवडताना संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासाचा पाया घातला. सहकारी चळवळीसाठी त्यांनी दिलेली तत्वे देशाला मार्गदर्शक असून त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त कृषी, सहकार, शिक्षण, समाजकारण या विविध क्षेत्रात उपक्रम राबवले जाणार आहे. यामध्ये विविध व्याख्याने, सेमिनार, नवनवीन तज्ञांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल. शेती व सहकारात काम करताना भाऊसाहेब थोरात यांनी साहित्य संस्कृतीही जपली आहे. त्यांच्या विचारांशी एकनिष्ठता या त्यांच्या तत्त्वांवर आपले तालुक्याचे राजकारण सुरू आहे.

संगमनेरकरांनाही उपक्रमा संबंधी कल्पना मांडता येणार:

सन 2024 हे सहकारमहर्षी, तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने तीर्थरूप दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासोबतच विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या लोगोचे अनावरण… pic.twitter.com/iBeGasW06A

— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 6, 2023

डॉ. तांबे म्हणाले, भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण केली. संगमनेर तालुका शिक्षण, समाजकारण, आरोग्य ग्रामीण विकास यामध्ये पुढे आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून प्रत्येकाच्या जीवनात क्रांती निर्माण झाली असून थोरात यांच्या प्रति प्रत्येकाच्या मनात कृतज्ञता आहे. हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला झोकून दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ग्राम विकासासाठी सहकाराचा मार्ग निवडला. वयाच्या 84 व्या वर्षी पर्यावरण संवर्धनासाठी दंडकारण्य अभियान आपल्याला दिले. तालुक्यातील प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांमधून आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.

प्रास्ताविक कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 632
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.