Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ! संगमनेरच्या न्यायालयाने दिलेला खटला चालविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टात कायम…
न्यायालय

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ! संगमनेरच्या न्यायालयाने दिलेला खटला चालविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टात कायम…

इंदुरीकरांविरोधात खटला चालविण्याचा मार्ग मोकळा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

प्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचा व त्याची सुनावणी संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

का गेले होते सुप्रीम कोर्टात: इंदुरीकर महाराज यांच्या वतीने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयात इंदुरीकर यांना दिलासा मिळाल्यानंतर प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात पोहोचले होते. तेथे संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम करण्यात येऊन खटला चालविण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे इंदुरीकर यांना सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली.

काय आहे प्रकरण: प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी आपल्या कीर्तनातून पुत्रप्राप्तीबाबत विधान केले होते. इंदुरीकर यांनी केलेले विधान वैज्ञानिक आधारावर नसल्याने त्यांच्या विधानावर आक्षेप घेण्यात आला होता तसेच त्यांनी गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याचा आरोप करीत PCPNDT (पीसीपीएनडीटी) समितीने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.

न्यायालयाने दिले होते गुन्हा दाखल करण्याचे आदेश; लिंगभेद करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांविरोधात PCPNDT (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार संगमनेरच्या न्यायालयात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने कलम 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याला इंदुरीकर महाराजांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिलं. जिल्हा व सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता. त्यानंतर याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकार यांच्या वतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तेथे कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवण्यात आला.

सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल ठेवला कायम: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा इंदुरीकर यांच्या विरोधात खटला चालवावा असा निकाल दिला होता. या विरोधात इंदुरीकर सुप्रीम कोर्टात गेले होते त्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला असल्याने इंदुरीकर यांच्यावर खटला दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,378
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला योग्य…

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.