Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करत समन्वयातून शिर्डीतील : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम यशस्वी करा: पालकमंत्री विखे पाटील
सामाजिक

पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करत समन्वयातून शिर्डीतील : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम यशस्वी करा: पालकमंत्री विखे पाटील

कार्यक्रमाची शिर्डीत जोरदार तयारी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती…

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – ११ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम होत आहे. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करत समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते.

बैठकीसाठी हे होते उपस्थित: यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदी उपस्थित होते.

लाभार्थ्यांसाठी ६०० पेक्षा अधिक एसटी बसेसची सुविधा: पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमास येता यावे यासाठी ६०० पेक्षा अधिक एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नोडल समन्वयक, अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर बैठका घ्याव्या: प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी गावनिहाय रूटप्लॅन, लाभार्थी वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचतील यादृष्टीने नियोजन करावे. कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने आरोग्याच्यादृष्टीने आरोग्य पथक, रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात यावी. तालुकास्तरावर नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

महसूल सप्ताहातून योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत: राज्यात पहिल्यांदाच महसूल दिनाऐवजी महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. विशेषतः महाविद्यालयातून कार्यक्रमांचे आयोजन करत योजनांची माहिती विध्यार्थ्यांमार्फत गावोगावी पोहोचविण्यात मोलाची मदत झाली. ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमातुन माजी सैनिकांच्या समस्यांची सोडवणुक करण्यात यश आले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक पालकमंत्र्यांनी केले.

मेरी माटी मेरा देश: आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम तसेच साक्षरता निर्माणासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी, मेरा देश उपक्रमाची घोषणा केली असून जिल्ह्यात हा उपक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” हा उपक्रमही राबविण्यात येत असुन या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 438
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.