Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

July 20, 2026

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार! यात्रेच्या माध्यमातून भ्रष्ट भाजपा सरकारची पोलखोल करणार: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
राजकारण

पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार! यात्रेच्या माध्यमातून भ्रष्ट भाजपा सरकारची पोलखोल करणार: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

महाराष्ट्रात काँग्रेस करणार भाजपाची पोलखोल
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 8, 2023Updated:August 8, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेणार.

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

हे नेते करणार नेतृत्व: गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी सांगितले की, राज्यातील सहा विभागात पदयात्रा काढण्यात येणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचे नेतृत्व मी स्वतः करणार आहे, अमरावती विभागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्र विभागात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मुंबईत माजी मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. कोकण विभागात सर्व नेते एकत्र येऊन पदयात्रा काढतील. या पदयात्रेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे.

पदयात्रेनंतर बस यात्रा: ही पदयात्रा झाल्यानंतर बसयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. भाजपा सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. शेतकरी, कामगार, गरिब, कष्टकरी जनता, तरुणवर्ग, महिलांचे प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर केंद्र व राज्यातील भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. भाजपा जाती धर्मात भांडणे लावून राजकीय पोळी भाजत आहेत. जनतेला वाऱ्यावर सोडून आपल्या मित्रांसाठी भाजपा सरकार काम करत आहे. यात्रेवेळी सभांच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे जनतेच्या समोर मांडले जाणार आहेत.

लोकसभा मतदारसंघाचा आढावा निरीक्षक नियुक्त: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरिक्षक ४८ मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतील, तेथील राजकीय परिस्थिती, पक्ष संघटनेची ताकद या सर्वांचा अभ्यास करून १५ ऑगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करतील व त्यानंतर या अहवालावर चर्चा केली जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार

यात्रेच्या माध्यमातून भ्रष्ट भाजपा सरकारची पोलखोल करणार.

लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेणार.

– प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा… pic.twitter.com/puP8DvYCsj

— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 8, 2023

राहुल गांधींचा मुंबईत करणार सत्कार: राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने काँग्रेस पक्ष व कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह संचारलेला आहे. राहुल गांधी हे न डगमगता केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करत असतात म्हणूनच भाजपाने षडयंत्र रचून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न केला. देशातील हुकूमशाही सरकार विरोधात लढणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा झालेली आहे. राहुल गांधी यांचा मुंबईत भव्य सत्कार करण्याचा प्रदेश काँग्रेसचा विचार असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी मंत्री नसीम खान यांनी यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांच्याशी दिल्लीत चर्चा केली आहे. प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांना सत्काराचे निमंत्रण दिले आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

हे पदाधिकारी होते उपस्थित: या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रवक्ते, डॉ. राजू वाघमारे, भरतसिंग आदी उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 448
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून…

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.