Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘जयहिंद’मुळे युवकांना व्यवसाय विकासाची संधी: डॉ. आनंद गोडसे
सामाजिक

‘जयहिंद’मुळे युवकांना व्यवसाय विकासाची संधी: डॉ. आनंद गोडसे

व्यवसाय हा प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य देतो: आमदार सत्यजित तांबे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/08/2023Updated:08/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

जयहिंदच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस युवकांचा मोठा प्रतिसाद

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी तरुणांना मोठी संधी आहे. नवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देत उद्दिष्ट ठेवून काम केल्यास यशस्वी उद्योजक होता येते. युवकांना व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी जयहिंद लोक चळवळीमुळे मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे गौरवोद्गार डॉ. आनंद गोडसे यांनी काढले.

कार्यशाळेला यांची होती उपस्थिती: मालपाणी लॉन्स येथे जयहिंद लोकचळवळ व दे असरा या संस्थेच्यावतीने व्यवसाय व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, पुणे येथील प्रशिक्षक डॉ. आनंद गोडसे व ऐश्वर्या कुलकर्णी, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.

गोडसे म्हणाले, नोकरीच्या संधी दिवसेंदिवस कमी होत असून युवकांनी उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे. या क्षेत्रात प्रत्येकाला मोठी संधी आहे मात्र मार्केटची स्थिती, आपली क्षमता ओळखून व्यवसाय निवडावा.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले, निकोप व निरोगी समाज निर्मितीसाठी जयहिंद लोक चळवळ काम करत असून मागील २५ वर्षात सातत्याने विविध उपक्रम राबवले. बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या असून त्यावर मात करण्यासाठी युवकांना स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन व्हावे, यासाठी असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून युवकांपुढे आदर्श उभा केला. रयतेचे स्वतःचे राज्य त्यांनी निर्माण केले व्यवसायामधून प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीतून कारखाना दूध संघ शैक्षणिक संस्था या माध्यमातून तालुक्याची आर्थिक प्रगती साधली असून आज यामुळे विविध क्षेत्रात ८० हजार लोकांना रोजगार मिळाले आहेत. शेती सुद्धा एक व्यवसाय असून नवीन कल्पना शेतीमध्ये रुजवली तर प्रत्येकाला मोठे यश मिळेल.

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, संगमनेर हे शिक्षण व आरोग्याचे मोठे हब असून मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे वार्षिक 5000 कोटींची उलाढाल तालुक्यातून होत असल्याने तरुणांना व्यवसायासाठी मोठी संधी आहे.

ऐश्वर्या कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येकाला दिवसभरात वेगवेगळ्या आयडिया येतात त्या आयडियाचे रूपांतर व्यवसायात ज्याला करता आले तो यशस्वी उद्योजक होऊ शकतो.

हे पदाधिकारी कार्यकर्ते देखील होते उपस्थित: अनंत शिंदे, अजय फटांगरे, रमेश गुंजाळ, मिलिंद कानवडे, गणेश मादास, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, गणेश गुंजाळ, नितेश शहाणे, विजय उदावंत, शेखर सोसे, सुमित पानसरे, राम जाजू, हर्षल राहणे, श्रेयस कर्पे, संकेत गुंजाळ, विशाल ढोरे, शुभम परदेशी, राहुल बर्गे, अजित दातीर, प्रमोद गाडेकर, ॲड. सुहास आहेर, मिलिंद औटी, प्रवीण कहांडळ, महेश दिघे, खालीद पठाण, शत्रुजीत खेमनर, राहुल गुंजाळ, अंकुश आरोटे आदींसह जयहिंदचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत कमलेश उनवणे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश गुंजाळ व नामदेव कहांडळ यांनी केले. डॉ. अभयसिंह जोंधळे यांनी आभार मानले.

महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी शिबिर…

युवक व युवतींचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी संगमनेरमध्ये उद्योजकता व व्यवसाय प्रशिक्षण शिबिर होणार असून यामध्ये अधिकाधिक युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

'जयहिंद लोकचळवळ' आणि पुण्यातील पर्सिस्टंट कंपनीने सुरु केलेल्या 'deAsra' फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर येथे आयोजित केलेल्या 'व्यवसाय व उद्योजकता विकास प्रशिक्षण' कार्यशाळेस तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यवसाय निवडण्यासह तो यशस्वी करण्यासाठीचा कानमंत्र तरुणाईला समजावा,… pic.twitter.com/asUuoakCet

— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 8, 2023

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 398
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.