Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकशाही व राज्यघटना वाचण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
सामाजिक

लोकशाही व राज्यघटना वाचण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

मणिपूरमधील महिला अत्याचाराची घटना देशासाठी कलंक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात रॅली आणि मेळावा

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – भारतीय राज्यघटना ही गोरगरीब आणि आदिवासींची कवचकुंडले आहे, मात्र काही लोक जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून आपसात भेद निर्माण करू पाहत आहे. मणिपूर मधील आदिवासी महिलांवर झालेली अत्याचाराची घटना देशासाठी कलंक असून लोकशाही व राज्यघटना वाचण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

रॅली आणि मेळावा: आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात पारंपारिक वेशभूषा, पारंपारिक नृत्य आणि घोषणांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक ते यशोधन कार्यालय दरम्यान झालेल्या रॅलीत शेकडो आदिवासी, शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर केली. त्यानंतर मालपाणी लॉन्समध्ये त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी डॉ. तांबे बोलत होते.

यांची होती उपस्थिती: यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, काशिनाथ गोंदे, नामदेव पारधी, हिरालाल पगडाल, शांताबाई खैरे, स्वाती मोरे, दशरथ गायकवाड, सुधाकर जोशी, अजय फटांगरे, संतोष हासे, दशरथ वर्पे, श्रीराम कु-हे, वैशाली साबळे आदी उपस्थित होते.

तांबे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आदिवासींच्या विकासासाठी वाडी वस्तीवर सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, आदिवासी म्हणजे रानपाखरू आहेत. पाने, फुले व निसर्गाशी त्यांचे जवळचे नाते आहे. शेतीचा शोध हा आदिवासी महिलेने लावला असून मनिपुरमध्ये झालेल्या आदिवासी महिलांवरील अत्याचारामुळे मणिपूर सरकार बरखास्त करून पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी आ. बाळासाहेब थोरात सातत्याने पाठपुरावा करत असून विधानसभेत ही त्यांनी आवाज उठवला आहे. आदिवासींच्या विकासाकरता जयहिंद कोळवाडे आश्रम शाळेची सुरुवात करण्यासह आदिवासी बांधवांसाठी एसएमबीटी हॉस्पिटल सुरू केले आहे. आदिवासी हा कष्टकरी समाज असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलींचे शिक्षण करावे व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन केले.

प्रा. बाबा खरात म्हणाले, आदिवासी समाज हा सहनशील असून तो तितकाच स्वाभिमानी व कडक आहे. शिक्षण हा आदिवासींच्या प्रगतीचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हिरालाल पगडाल, दशरथ गायकवाड, बाळकृष्ण गांडाळ , दिलीप बांबळे यांनीही मनोगते व्यक्त केली.

प्रास्ताविक आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी आभार मानले.

काँग्रेस कमिटीच्यावतीनेही प्रभात फेरी…

क्रांती दिनानिमित्त संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी नेहरू चौक येथे अभिवादन करून महात्मा गांधी चौक स्वातंत्र्य चौक या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब डांगरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 470
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.