Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “मेरी मिट्टी मेरा देश” अभियानात संगमनेर नगर परिषदेचा सहभाग; राबविले ‘हे’ उपक्रम…
प्रशासन

“मेरी मिट्टी मेरा देश” अभियानात संगमनेर नगर परिषदेचा सहभाग; राबविले ‘हे’ उपक्रम…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/08/2023Updated:10/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – केंद्र सरकारकडून देशभर राबविल्या जात असलेल्या “मेरी मिट्टी मेरा देश”अभियानात संगमनेर नगर परिषदेने सहभागी होत क्रांती दिनी संगमनेरमध्ये विविध उपक्रम राबविले, अशी माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सूचित केल्यानुसार राज्यभरात देखील 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान “मेरी मिट्टी मेरा देश”अभियान राबविले जात आहे. या दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहिदांच्या स्मृतीस अभिवादन: याच अभियानाचा एक भाग म्हणून संगमनेर नगर परिषदेत देखील क्रांती देणे 9 ऑगस्टला “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियानांतर्गत शहरातील नेहरू चौक भागात असलेल्या अशोक स्तंभ येथे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या हस्ते व कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, नवीन मराठी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहिदांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

प्रभात फेरी: अशोक स्तंभ ते महात्मा गांधी स्मारकापर्यंत उपस्थितांची सर्व समावेशक प्रभात फेरी काढण्यात आली होती. प्रभात फेरीत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांचा वेश परिधान केला होता. नंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकास अभिवादन करण्यात येऊन नगर परिषदेच्या प्रांगणात विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पंचप्राण शपथ देण्यात आली.

वृक्षारोपण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील एम.एस.सी.बी. कॉलनी या ठिकाणी नगर परिषदेच्यावतीने अमृत वाटिका तयार करून या ठिकाणी ७५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

शीला फलकाचे अनावरण: सायंकाळी पाच वाजता नगर परिषदेच्या प्रांगणात देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी हुतात्मा झालेल्या थोर व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ शीलाफलक उभारण्यात आला असून शहरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब डांगरे, नंदिनी कांबळे, आशाबाई जोंधळे, सुशीला निऱ्हाळी, गीता गुजर, ज्योती गुजर, सत्यभामा महाले, उदयसिंह परदेशी, तसेच हिराबाई गोसावी आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा नगर परिषदेच्यावतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना पंचप्राण शपथ देण्यात आली.

यांची होती उपस्थिती: यावेळी राजेश गुंजाळ, प्रदीप मावळकर, विजय गाडेकर, अमजद पठाण, साजिद पटेल, प्रशांत जुन्नरे, पंकज मुंगसे, विशाल कोल्हे, उमेश ढोले, शशिकांत जोशी, गौरव मंत्री, बाळासाहेब साळवे , सुदाम सातपुते यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 995
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.