Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » येताय ना? भंडारदरा आणि आंबोलीत वर्षा महोत्सवाचा आनंद लुटायला! पर्यटन विभागाचा १२ ते १६ ऑगस्टदरम्यान मान्सून फेस्टिवल
सामाजिक

येताय ना? भंडारदरा आणि आंबोलीत वर्षा महोत्सवाचा आनंद लुटायला! पर्यटन विभागाचा १२ ते १६ ऑगस्टदरम्यान मान्सून फेस्टिवल

पर्यटन संचालकांचे आवाहन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – पावसाची अनेकविध रुपे आपल्याला माहित आहेत. घराच्या कौलांवरून कोसळणार्‍या सरी, अंगणात साचलेल्या डब्यात विहरणार्‍या कागदाच्या होड्या, दूर रानात पानापानावर टपटपणारा मुसळधार पाऊस आणि एका छत्रीतल्या दोन जीवांना शीलगावणारा पाऊस… पाऊस म्हणजे उत्सव, पाऊस म्हणजे धमाल… पावसाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्यावतीने येत्या 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान भंडारदरा आणि आंबोली येथे वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे.

शेतकरी सुखावलाय: आषाढातल्या बहुप्रतीक्षेनंतर अखेरीस अधिक श्रावणात पावसाचे दमदार आगमन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात झाले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी चातकासारखी वाट पाहत असलेला शेतकरी राजा त्यामुळे सुखावला आहे. महाराष्ट्रातल्या गावागावात पेरण्या करण्याचे काम जोरदार सुरू आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. परंतु या सगळ्यातलं समान सूत्र आणि समान धागा म्हणजे पाऊस पडतो आहे.

वर्षा महोत्सव: 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पासून सुरू होणार्‍या ह्या वर्षा महोत्सवामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी, वैभवशाली परंपरा आणि आदिवासी बांधवांच्या दुर्लक्षित राहिलेले कलागुण, त्याचबरोबर खाद्य परंपरा, येथील दुर्ग आणि सुळके, येथील जैव विविधता अशा अनेक गोष्टींना व्यासपीठ देणारा हा महोत्सव खर्‍या अर्थाने भंडारदरा व आंबोली पर्यटनाला चालना देणारा महत्त्वाचा ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या कला वैभवाची महोत्सवात पर्वणी:  त्याचबरोबर पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात कोसळणार्‍या पावसाचा आनंद घेतानाच, महाराष्ट्रातल्या कला वैभवाची पर्वणी पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांनी आणि पावसाच्या थेंबावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली पाहिजे आणि पावसाचे पाच दिवस मंतरलेले अनुभवलेच पाहिजेत, असे आवाहनही पर्यटन संचालकांनी केले आहे. 

पर्यटन वाढीस मदत: जैव विविधता आणि निसर्ग सुंदरता यांचा आनंद पर्यटकांना घेता येईल. यामुळे स्थानिक पर्यटन वाढीसाठी मोठी मदत होईल असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 983
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.