Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दंडकारण्य अभियान… राजहंस दूध संघाने हिरवाईतून फुलविला देवगड परिसर
सामाजिक

दंडकारण्य अभियान… राजहंस दूध संघाने हिरवाईतून फुलविला देवगड परिसर

हिरवाई हीच खरी समृद्धी : रणजीतसिंह देशमुख
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – पर्यावरण संवर्धनाची सर्वात मोठी लोक चळवळ बनलेल्या दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून राजहंस दूध संघाने हिवरगाव पावसा येथील देवगड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले असल्याने हा परिसर हिरवाईने फुलला असल्याचे प्रतिपादन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. तर हिरवाई हीच खरी समृद्धी असल्याचे दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले आहे.

वृक्षारोपण: हिवरगाव पावसा येथील देवगड डोंगर परिसरात संगमनेर तालूका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रीया संघाच्यावतीने दंडकारण्य अभियानांतर्गत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.

हे होते उपस्थित: यावेळी प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे, दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक विलास वर्पे, भास्कर सिनारे, विलास कवडे, संतोष मांडेकर, विक्रमराजे थोरात, रविंद्र रोहम, बबनराव कुऱ्हाडे, डॉ. प्रमोद पावसे, प्रतिभा जोंधळे, सुषमा भालेराव, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, गणपतराव शिंदे, देवगड देवस्थानचे अध्यक्ष उत्तमराव जाधव, उपाध्यक्ष यादवराव पावसे, गणपत हासे, गोरक्षनाथ पावसे, बबन शिंदे, मोठ्याभाऊ बढे, चंद्रशेखर गडाख, पांडूरंग गडाख, संदिप पावसे, अशोक पावसे, अभियानाचे सावंत, फापाळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले दंडकारण्य अभियान राज्याला दिशादर्शक ठरले आहे. आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली. दूध संघाने मागील चार वर्षात देवगड परिसरात केलेल्या वृक्षरोपण व संवर्धनामुळे हा परिसर हिरवाईने फुलला आहे. देवगड हे तालुक्याचे मोठे आध्यात्मिक क्षेत्र असून अध्यात्म आणि पर्यावरण असा हा दुहेरी संगम या परिसराला लाभला असल्याने तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी ठिकाणी वाढणार आहे.

रणजितसिंह देशमुख म्हणाले, दूध संघाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात मोठी आर्थिक समृद्धी निर्माण केली असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. कोरोनाच्या संकटानंतर प्रत्येकाला पर्यावरणाचे महत्व पटू लागले असून वृक्ष व हिरवाई हीच खरी आपली समृद्धी आहे.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरण गीते सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. प्रमोद पावसे यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 913
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.