Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेनेने स्वातंत्र्यदिनी मुख्याधिकाऱ्यांना ध्वजारोहण करू न देण्याचा दिला इशारा… आणि प्रश्न लागला मार्गी
आंदोलन

शिवसेनेने स्वातंत्र्यदिनी मुख्याधिकाऱ्यांना ध्वजारोहण करू न देण्याचा दिला इशारा… आणि प्रश्न लागला मार्गी

मुख्याधिकारी राहुल वाघ, आमदार बाळासाहेब थोरात यांचेही मानले आभार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – स्वातंत्र्यदिनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा व नगरपालिका सांगण्यात उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिली.

मुख्याधिकारी वाघ आमदार थोरात यांचे मानले आभार: निवेदनात करण्यात आलेली मागणी मान्य करण्यात आली असून प्रत्यक्षात कार्यवाहीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी समक्ष पाहणी करत घरांचे मोजमाप घेऊन मालमत्ता कराचे फॉर्म भरण्यास सुरुवात केल्याने नागरिकांच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख कतारी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व संगमनेरचे लोकप्रतिनिधी, माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहे.

काय होती मागणी: शहरातील संजय गांधी नगर, वडार वस्ती व नगरपालिका हद्दीतील सर्व झोपडपट्टी धारकांच्या घराचे मोजमाप करून त्यांना सातबारा आठ अ व असेसमेंट उतारा मिळावा, अशी मागणी 28 डिसेंबर 2022 रोजी शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. यासाठी लेखी स्वरुपात 2015 पासून करण्यात आलेले अर्ज, निवेदने, आवश्यक पुरावे देखील सादर करण्यात आले होते. या सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांना मालकीचा सातबारा असेसमेंट देण्याबाबत कोणतीही हरकत नसल्याचे लेखी स्वरूपात मान्य केले होते.

का दिला होता ध्वजारोहणापासून रोखण्याचा इशारा: मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही पालिका प्रशासनाकडून केली गेली नसल्याने व आंदोलनकर्त्यांना दिलेल्या मागणीकडे प्रशासनाकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेना शहर प्रमुख कतारी यांच्याकडून पुन्हा नगरपालिकेला स्मरणपत्र देत गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत मागणीचा विचार करण्यात आला नाही. तसेच पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना 15 ऑगस्टला ध्वजारोहण करून न देण्याचा तसेच नागरिकांसह नगरपालिकेच्या प्रांगणात उपोषणास बसण्याचा, तसेच या संदर्भात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

सूत्रे हलली: या निवेदनानंतर तातडीने पालिका प्रशासनाची सूत्रे हलली आणि मुख्याधिकाऱ्यांकडून निवेदनाला लेखी स्वरूपात कार्यवाही सुरू झाल्याबद्दल पत्र देण्यात आले. पालिका प्रशासनाने नगरपालिका मालमत्ता कर, असेसमेंट संदर्भातील संबंधितांचे फॉर्म भरून घेण्यास, तसेच घरोघरी जाऊन समक्ष पाहणी करत घरांचे मोजमापदेखील घेण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत संबंधितांना सातबारा उतारा असेसमेंट देण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केले. पालिकेने सुरू केलेल्या कार्यवाहीमुळे संबंधितांना हक्काचा सातबारा, असेसमेंट उतारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांनी मुख्याधिकारी राहुल वाघ, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्यासह संबंधितांचे आभार व्यक्त केले आहे.

हे होते उपस्थित: यावेळी नामदेव फुलमाळी, दीपक कतारी, संजय तडासम, मच्छिंद्र कतारी, दारासिंग कतारी, साहेबराव जाधव, साहेबराव गुंजाळ, कांतीलाल कतारी, वसीम अत्तार, राजू गायकवाड, राजू ठाकरे, प्रकाश चोथवे, सुनील धोत्रे, पिंटू गायकवाड, सुरज कतारी, विक्रम कतारी, प्रशांत खजुरे, फरोज कतारी आदींसह महिला उपस्थित होत्या.

…आंदोलन मागे

मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी मागण्यांची दखल घेत प्रत्यक्षात कार्यवाहीला देखील सुरुवात केली आहे. तसेच सदरची कार्यवाही सन 2023-2024 या आर्थिक वर्षात पूर्ण केली जाणार आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांचे लेखी पत्र देखील प्राप्त झाले असून नागरिकांच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचे व उपोषणाचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 

अमरभाऊ कतारी, शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 678
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.