Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था 81 कोटीचा अपहार; अटकेतील पाच आरोपींच्या कोठडीसंदर्भात सोमवारी न्यायालयात झाला हा निर्णय… संगमनेर शहर पोलिसांकडून तपास काढत यांच्याकडे सोपविला
न्यायालय

दूधगंगा पतसंस्था 81 कोटीचा अपहार; अटकेतील पाच आरोपींच्या कोठडीसंदर्भात सोमवारी न्यायालयात झाला हा निर्णय… संगमनेर शहर पोलिसांकडून तपास काढत यांच्याकडे सोपविला

मुख्य आरोपी अद्याप बाहेरच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरातील बहुचर्चित ठरलेल्या आणि सहकारी चळवळीवर आधारित असलेल्या पतसंस्था विश्वातील सर्वात मोठ्या 81 कोटीच्या अपहार प्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी दिली आहे. 

आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग: दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा प्राथमिक तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केला होता. मात्र गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता अपहाराची रक्कम मोठी असल्याने, गुन्हा गुंतागुंतीचा क्लिष्ट व किचकट स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची संख्या देखील मोठी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा गुन्हा शहर पोलिसांकडून काढून अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोमवारी वर्ग केला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा पुढील तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली पोलीस कोठडीची मागणी: लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तीन रोखपालांसह अमोल प्रकाश क्षीरसागर या वैधानिक लेखापरीक्षक आणि व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ या पाच आरोपींची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने व सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक कमलाकर जाधव यांनी आरोपींना वाढीव पोलीस कोठडी मिळण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले होते. मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

आत्तापर्यंत मुख्य आरोपी पैकी एकालाच अटक: संगमनेर शहरातील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल 81 कोटीचा अपहार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 21 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरकरांचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागलेल्या या घोटाळ्यात पोलिसांनी आतापर्यंत केवळ पाच आरोपींना अटक केली. यात गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग असलेल्या संस्थेच्या मॅनेजरचा तर अपहार करणाऱ्या 15 जणांना सहकार्य करणाऱ्या चार जणांचा अटकेतील आरोपीत समावेश आहे.

मास्टर माईंड फरार; अटकपूर्व जामनांसाठी काहींचे अर्ज: आर्थिक घोटाळ्याच्या या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मास्टर माईंड असलेला बँकेचा अध्यक्ष, राजकीय नेता भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयातील आरोपींसह अद्यापही पसार आहे. तब्बल डझनभर आरोपींच्या पोलीस शोधात असे असले तरी यातील काही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,468
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.