Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!
न्यायालय

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

पोलिसांचे ब्रीदवाक्य 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असले तरी या प्रकरणात पोलीसच एका लहान मुलासाठी खलनायक ठरल्याची भावना व्यक्त होत आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2026Updated:03/07/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर शहर पोलिसांचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कारनामा समोर आला असून, दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला चक्क २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने जेलमध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर तीव्र शब्दात प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तपासी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणावरून आता मानवाधिकार आयोग देखील चौकशी करण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.
एवढा गंभीर प्रकार घडत असताना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या देखील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपासी अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकारी का पाठीशी घालतात याचे कारण अर्थकारणात दडले असल्याचे बोलले जाते.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री कोल्हेवाडी रोड परिसरात गस्त घालत असताना संगमनेर पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला ताब्यात घेतले होते. यामध्ये सलिम अकबर पठाण, अलीम अकबर पठाण, वसीम मन्सुर शेख, निलेश बाळासाहेब शेळके, सलमान अकबर पठाण यांच्यासह एका १२ वर्षांच्या बालकाचा समावेश होता. मात्र, पोलिसांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा वयाचे सबळ पुरावे न तपासता, केवळ अंदाजाने फिर्यादीत मुलाचे वय १९ वर्षे आणि अटक पंचनाम्यात २० वर्षे नोंदवले. इतकेच नव्हे, तर कायदेशीर नियमांना केराची टोपली दाखवत या अल्पवयीन मुलाला बेड्या ठोकल्याचे आणि त्याला जामीनही मिळू न दिल्याचे समोर आले आहे.
नियमानुसार अल्पवयीन आरोपींच्या चौकशी दरम्यान खाकी वर्दी घालण्यासही मनाई असताना, तपासी अधिकाऱ्याने सर्व नियम धाब्यावर बसवून मुलावर दबाव आणल्याचा आरोप होत आहे. भीतीपोटी या बालकाने पोलिसांच्या सांगण्यावर होकार दिला आणि यामुळेच एका निरपराध विधीसंघर्ष बालकाला पाच महिने तुरुंगाची हवा खावी लागली. या मुलाचे आई-वडील मूळचे उत्तर प्रदेशचे असून, मुलगा बेपत्ता झाल्याने शोध घेत ते जेव्हा संगमनेरला आले, तेव्हा त्यांना आपला मुलगा जेलमध्ये असल्याचे समजले. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या जन्मदाखल्यानुसार, अटक केली तेव्हा त्या बालकाचे वय अवघे १२ वर्षे १ महिना ८ दिवस होते.
पोलिसांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असले तरी या प्रकरणात पोलीसच एका लहान मुलासाठी खलनायक ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. कायदा सांगतो की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होऊ नये, परंतु पोलिसांनी बाल न्यायालयात किंवा बालसुधारगृहात पाठवण्याऐवजी स्वतःच न्यायधीश बनून त्याला मुख्य कारागृहात डांबून ठेवले.
या प्रकरणाची उच्च न्यायालयात ‘हेबीअस कॉर्पस’ (बेकायदेशीर अटकेविरुद्धची याचिका) अंतर्गत रिट याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. के. डी. दारोळे यांनी दिली आहे. तर रवींद्र शेळके, ॲड. विनय लंकेश्वर आणि ॲड. सागर शिंदे यांनी याविरोधात कायदेशीर लढा उभारणार असल्याचे जाहीर केले आहे.
सध्या संगमनेर तालुक्यातील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून, संबंधित तपासी अधिकाऱ्याचे निलंबन करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. आता या सर्व गंभीर प्रकारावर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठीशी घालण्याच्या भूमिकेवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,352
गुन्हेगारी न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अकोले तालुक्यातील कोतूळ…

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.