महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – जनआरोग्यम परिवार आयोजित जाणीव फाउंडेशनचा यावर्षीचा लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्कार सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नम्रता पवार यांना जाहीर झाला आहे.
अध्ययन, अध्यापनासाठी पुरस्कार: फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अमित पाटणकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शैक्षणिक अध्ययन, अध्यापनात नव संजीवनी ठरावा असा हा पुरस्कार पवार यांना देण्यात येणार आहे.
रविवारी वितरण: शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा हा पुरस्कार पवार यांना रविवारी (3 सप्टेंबर) बीएसटी महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात वितरित केला जाणार आहे. पुरस्काराबद्दल पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

