Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था 81 कोटीचा अपहार; मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह 8 जणांनी दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज… न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायालय

दूधगंगा पतसंस्था 81 कोटीचा अपहार; मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह 8 जणांनी दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज… न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

सरकारच्यावतीने सरकारी वकील म्हणणे मांडणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरच्या सहकारी पतसंस्थांच्या विश्वासार्हतेला गालबोट लावणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह आठ आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून याप्रकरणी न्यायालयात कधी सुनावणी होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भात सरकारी वकील सरकार पक्षाचे म्हणणे मांडणार असल्याची माहिती मिळते.

यांनी केला अर्ज: 81 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोधर कुटे याच्यासह पत्नी शकुंतला कुटे, विमल कुटे, मुलगा संदीप, अमोल आणि दादासाहेब कुटे यांच्यासह सून सोनाली या मुख्य आरोपीसह अन्य एक आरोपी नाशिक येथील सनदी लेखापाल अरुण के. बुरड यांनी हा अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे. बुरड यांच्यावर आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप आहे. 

मुख्य आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी: एवढ्या मोठ्या रकमेचा आर्थिक घोटाळा समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने मुख्य आरोपींना अटक करणे आवश्यक होते. मात्र या प्रकरणात असे घडताना दिसले नाही. गुन्ह्यासंदर्भात आधीच वाच्यता झाल्याने आरोपी पसार झाल्याचे सांगितले जाते. असे असले तरी गुन्हा दाखल होऊन दहा-बारा दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील पोलिसांना आरोपींचा शोध घेता आलेला नाही. मुख्य आरोपी असलेला भाऊसाहेब कुटे हा राजकीय नेता असून मावळत्या जिल्हा परिषदेचा माजी सदस्य देखील आहे.

पोलिसांवर दबावाची चर्चा: राजकीयदृष्ट्या वजनदार असलेल्या व सहकारातील विविध संस्थांवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत पदाधिकारी राहिलेल्या या नेत्याला व त्याच्या कुटुंबीयांना अटक करू नये, यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची देखील चर्चा होताना दिसते. एरव्ही सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांना मुख्य आरोपीचा शोध लावणे फारसे कठीण नाही. यातच या गुन्ह्याचा तपास संगमनेर शहर पोलिसांकडून काढून पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

अर्जावरील सुनावणीकडे लक्ष: या पार्श्वभूमीवर संधी मिळताच मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याने स्वतःसह कुटुंबीयांना अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे.

म्हणणे मांडणार: यासंदर्भात सरकारच्यावतीने सरकारी वकील आपले म्हणणे न्यायालयासमोर सादर करणार आहे. या जामीन अर्जावर कधी सुनावणी होते आणि काय निर्णय होतो याकडे संस्थेतील ठेवीदार सभासदांसह संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,842
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.