Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संगमनेरमधील शिक्षिका वृषाली कडलग यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांसह मान्यवरांची होती उपस्थिती
शिक्षण

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संगमनेरमधील शिक्षिका वृषाली कडलग यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांसह मान्यवरांची होती उपस्थिती

कडलग संगमनेर तालुक्यातील धांदरफळच्या देशमुखमळा शाळेत कार्यरत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी 5 सप्टेंबर राज्यातील 108 शिक्षकांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात संगमनेर तालुक्यातील धांदरफळच्या देशमुख मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांचा समावेश होता.

कार्यक्रमावेळी हे होते उपस्थित: मुंबईच्या नरिमन पॉईंटवरील टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कपिल पाटील, कौशल्य विकास विभाग तथा मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या कार्याची घेतली दखल: एक लाख दहा हजार रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे कडलग यांना मिळालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराचे स्वरूप आहे. कडलग यांनी शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी लोकसहभागातून केलेल्या कार्याची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली. त्यांनी शाळा आयएसओ प्रमाणित करण्याबरोबरच शाळा सौर ऊर्जा प्रकाशित केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी नो प्लास्टिक उपक्रम राबविला. गावातील ग्रामस्थांना एकत्र आणत लोकसहभागातून शाळेचा भौतिक विकास साधण्याची किमया कडलग यांनी साधली.

हे उपक्रम राबविले: कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन, राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक मासिकात ५ संशोधनपर प्रबंध सादरीकरण, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरावरील नियतकालिकात १० पेक्षा जास्त लेख प्रसिध्द, शासनाच्या दिक्षा ॲप, व्ही स्कूल ॲपसारख्या वेब पोर्टलवर १४ व्हिडीओ प्रसिध्द तसेच यु ट्युब चॅनल, शैक्षणिक ब्लॉग या माध्यमातून शैक्षणिक व्हिडीओची निर्मिती, नाविन्यपूर्ण उपक्रम सोलर सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, परसबाग, औषधी वनस्पती एक मूल एक झाड, डिजीटल स्कूल, काच फलक, ११ टॅबचे वाटप, ११ सायकलींचे वाटप, ११ विद्यार्थी दत्तक, कंपोस्ट खत, शैक्षणिक सहल, आनंदी शाळा, वाचन पेटी, ग्रंथालय, पेपर कट्टा, ओला सुका ई कचरा नियोजन, बालोद्यान, विज्ञानप्रदर्शन प्रथम क्रमांक, इनरव्हीलमध्ये (International NGO) सदस्य असतांना २१ शाळा डिजीटल केल्या. हॅन्ड सॅनिटायझर मशिन, ज्ञानरचनावादी साहित्य, प्लॅस्टिक मुक्त भारत उपक्रम अशा कार्याची दखल घेण्यात आली आहे.

अभिनंदन: याशिवाय इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या त्या माजी प्रेसिडेंट असून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. कडलग यांचे नगर विकास विभाग मंत्रालय मुंबईचे उपसचिव विजय चौधरी, गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, विस्तार अधिकारी सुवर्णा फटांगरे, एकनाथ भांगरे, केंद्र प्रमुख दत्ता कर्पे, मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,527
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.