Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जाणीव फाउंडेशनचा ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सुरेखा भालेराव यांना प्रदान
शिक्षण

जाणीव फाउंडेशनचा ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सुरेखा भालेराव यांना प्रदान

शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – जनआरोग्यम परिवार व जाणीव फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडझरी खुर्द येथील पदवीधर शिक्षिका श्रीमती सुरेखा आनंदराव भालेराव यांना प्रदान करण्यात आला.

यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नाशिक जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे, नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे नितीन ठाकरे, संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील आदींच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयात नुकताच हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पुरस्कार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामाची दखल: भालेराव गेली २५ वर्षे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सेवा बजावत आहेत. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव शाळेतून नोकरीची सुरुवात करून, संगमनेर तालुक्यातील भागवतवाडी, करुले, तळेगाव दिघे, तिगाव व वडझरी खुर्द येथे काम करत असताना त्यांनी सातत्याने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. सेवेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले. यामध्ये अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक जाणीवजागृती, तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात सहभाग आदी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवले.

यांचीही होती उपस्थिती: त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आदिवासी सेवक बाबा खरात, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

परिश्रम: कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जनआरोग्यम व जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे, कार्याध्यक्ष अमित पाटणकर, समन्वयक अंतोन मिसाळ, उपाध्यक्ष भाऊसाहेब काकड, संदीप काकड, बाळासाहेब पुलाटे आदींनी परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 900
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.