Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान भव: उपक्रमाचा राज्यात शुभारंभ: उपनगराध्यक्ष वडजे
आरोग्य

नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान भव: उपक्रमाचा राज्यात शुभारंभ: उपनगराध्यक्ष वडजे

अकोले ग्रामीण रुग्णालयात कार्यक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/09/2023Updated:14/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अकोले (अहमदनगर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी देशातील व राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयुष्यमान भव: हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्याचे अनेक उपक्रम राबविले जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान भव: योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी केले.

यांची उपस्थिती: अकोले ग्रामीण रुग्णालयात आयोजित “आयुष्यमान भव:” उपक्रमाचा शुभारंभ वडजे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्राध्यापक सुरेश खांडगे होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहत्रे, नगरसेवक चौधरी, माजी नगरसेवक परशराम शेळके, नवनाथ मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोपेरे, करवंदे, डॉ. राहणे, डॉ. प्रज्वल मुंढे आदी यावेळी उपस्थित होते.

वडजे म्हणाले, अकोले ग्रामीण रुग्णालयात उत्तम पद्धतीने रुग्ण सेवा दिली जात असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहत्रे यांच्या रुग्णसेवेचा नावलौकिक तालुक्यात वाढल्याने ग्रामीण रुग्णालयाकडे लोकांचा कल वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान भारत या संकल्पनेतून देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. या योजनेअंतर्गतच आयुष्यमान भव: हा उपक्रम देशवासियांसाठी सुरू करण्यात आला आहे.

नगरपंचायतीचा सहभाग: दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. आयुष्यमान भव: अंतर्गत अनेक उपक्रम राबविले जाणार असून आवश्यक तेथे अकोले नगरपंचायत देखील सहभाग देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रा. खांडगे म्हणाले, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुण्य आणि समाधानाचे काम करण्याचे भाग्य लाभते. कोणत्याही विभागाचा करता जर कर्तबगार असेल तर त्या विभागात कोणत्याही प्रकारे अडचण येत नाही. तेथे निश्चित चांगले काम होत असते. असेच काम अकोले तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. मेहेत्रे यांनी रुग्णालयाचा कायापालट केला असून त्यांच्यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

अवयव दान उपक्रम: केंद्र व राज्य सरकारच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आयुष्यमान भव हा उपक्रम सुरू होत असून या उपक्रमांतर्गत स्वच्छतेपासून अनेक आरोग्याचे उपक्रम होणार आहेत. अवयव दान ही सुंदर संकल्पना असून आपणास मरणोत्तर जिवंत ठेवणारा हा उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येकाने अवयव दानाचा संकल्प करावा असे आवाहन खांडगे यांनी केले.

सूत्रसंचालन डॉ. संदीप कडलग यांनी केले. तसेच अवयवादानाची त्यांनी शपथ दिली. आभार रुग्णालयाचे फार्मासिस्ट पाटील यांनी मांडले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 578
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.