Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत
आरोग्य

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

या संदर्भात येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, स्थानिक आमदार, मंत्री छगन भुजबळ आणि बदापूर ग्रामपंचायत यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
​येवला:
येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकऱ्यांसमोर सध्या एक मोठे संकट उभे राहिले आहे. येथील ‘वर्मा कंपनी’कडून गेल्या महिनाभरापासून रासायनिक आणि दूषित सांडपाणी उघड्यावर तसेच शेताच्या कडेला असलेल्या नाल्यांमध्ये सोडले जात आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरातील शेतीचे आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून, संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
​कंपनीतून निघणारे हे घातक केमिकलचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हे पाणी आता शेतीसाठी किंवा पिण्यासाठी अजिबात योग्य राहिलेले नाही. दुर्दैवाने, याच विहिरींचे पाणी पिकांना दिल्याने शेतातील पिके जळून खाक होत आहेत, तर सुपीक जमीन सातत्याने नापीक बनत चालली आहे. या दूषित पाण्यामुळे मुख्यत्वे ऊस पिकाला खूप मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
​परिस्थिती एवढी गंभीर बनली आहे की, मागील ७ ते ८ दिवसांत हे रासायनिक सांडपाणी स्थानिक तलावात जाऊन मिसळल्यामुळे तलावातील शेकडो मासे मोठ्या प्रमाणावर मरून पडले आहेत. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
​या गंभीर समस्येची दखल घेत बदापूर येथील ग्रामस्थ आणि शेतकरी नानासाहेब महिपत मोरे व इतर सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. त्यांनी या संदर्भात येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, स्थानिक आमदार, मंत्री छगन भुजबळ आणि बदापूर ग्रामपंचायत यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषी कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी आर्त हाक बदापूरच्या शेतकऱ्यांनी दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 509
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

माझ्या डोळ्यांनी पाहिलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट)

19/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar10/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन…

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.