Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार सामान्य माणसांपर्यंत नेण्याची गरज! सावळीविहीरमध्ये काँग्रेसची जनसंवाद यात्रा
राजकारण

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार सामान्य माणसांपर्यंत नेण्याची गरज! सावळीविहीरमध्ये काँग्रेसची जनसंवाद यात्रा

जनसंवाद यात्रेला सावळीविहीरकरांचा प्रतिसाद
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – सध्या देश एका वेगळ्या संक्रमणातून जात असून हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असलेली देशाची वाटचाल लोकशाहीसाठी धोकादायक असल्याने जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार सामान्य माणसांपर्यंत नेण्याचे आवाहन काँग्रेसच्या सचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी केले.

जनसंवाद यात्रेस यांची उपस्थिती: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश महासचिव व राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते, तालुका निरीक्षक सचिन गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, ज्येष्ठ नेते मामा पगारे, सावळीविहीरचे काँग्रेस अध्यक्ष साहिल म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सावळीविहीर गावामध्ये काँग्रेसची जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेत कार्यकर्त्यांसह गावकरी सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, ॲड. अविनाश शेजवळ, सिमोन जगताप, राहत्याचे अध्यक्ष नितीन सदाफळ, डॉ. एकनाथ गोंदकर, लताताई पारधे, अविनाश दंडवते, अशोक आगलावे उपस्थित होते.

रुपवते म्हणाल्या, सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. 2014 नंतर राज्यात महागाईने उच्चांक गाठला असून त्या अगोदर स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल डिझेल आणि अन्नधान्याच्या किमती काय होत्या. देश एका वेगळ्या वाटेने जात आहे. मणिपूरच्या घटनेकडे बघायला सरकारला वेळ नाही. शिर्डीच्या देवस्थानात अडीचशे कोटी रुपये खर्च करून दर्शन रांग बांधली मात्र ती अजून सुरू का होत नाही असे प्रश्न उपस्थित करत देशात व राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची गरज असल्याचे सांगितले.

पंकज लोंढे म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्यातील प्रत्येक गावात काँग्रेसचे जनसंवाद यात्रा काढली जाणार असून या यात्रेच्या माध्यमातून गावागावात काँग्रेसचा विचार पोहोचविणार आहोत. सद्यस्थितीत देशाचे लोकशाही धोक्यात आली असून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी हे चित्र बदलण्याची गरज आहे.

साहिल म्हस्के म्हणाले, सर्वसामान्य माणूस लोकशाही वाचवण्यासाठी जागृत झाला नाहीतर या देशात हुकूमशाही येईल व सर्वसामान्य जनतेला ते कधीही परवडणारे नाही. लोकांची चळवळ अन विचार म्हणचे काँग्रेस अन ती टिकली पाहिजे. सचिन गुजर, मामा पगारे यांचीही यावेळी भाषणे झाली.

हे होते उपस्थित: यावेळी संजय पगारे, मुन्ना फिटर, अमोल आरणे, अनिस शेख, उत्तमराव मते, संजय जेजुरकर, रमेश गागरे, सुरेश आरणे, बाबासाहेब काळे, सतीश काळे, किशोर गाडेकर, बबनराव नळे, अमोल बनसोडे, संदीप कोकाटे, प्रवीण घोडेकर, मच्छिंद्र गुंजाळ, अभिषेक वाघमारे, अशोक पारधे, चंद्रशेखर कार्ले, अण्णासाहेब मेचे, राजेंद्र निर्मळ, प्रसाद आहेर, अनिस सरोदे, राज लांडगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 518
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.