Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील प्रत्येक प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करणार: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिक्षण

राज्यातील प्रत्येक प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करणार: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/09/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर महाविद्यालयात ‘युवा ही दुवा’ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटन

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – आजचा युवक उपक्रमशील आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या बदलत्या गोष्टी तो जलदपणे आत्मसात करतो. युवकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी यापुढे प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र चालविण्याचे धोरण आणण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी संगमनेर येथे केले.

यांची उपस्थिती: महसूल विभागाच्यावतीने संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘युवा ही दुवा’ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.‌ यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड, तहसीलदार धीरज मांजरे आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलता वाव देण्याबरोबरच त्यांना कमवा व शिकाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची सोय व्हावी. यासाठी महाविद्यालय, दिव्यांग, एकल महिलांना यापुढे सेतू केंद्र देण्याचे शासनाने धोरण आहे. प्रत्येक वर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो.‌ या वर्षी महसूल दिनी महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. यात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ ह्या स्तुत्य उपक्रमात हजारो प्रकरणे निकाली काढून राज्यात हजारो सैनिकांना न्याय देण्यात आला.

‘युवा‌ ही दुवा’: महसूल सप्ताहातच समाजाच्या उन्नतीसाठी ‘युवा ही दुवा’ हा उपक्रम राबविण्यात आला. ‘युवा‌ ही दुवा’ या स्तुत्य उपक्रमात यशस्वी सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांची उपक्रमशीलता दिसून आली. महसूली व इतर शासकीय सेवा ऑनलाईन देण्यात महाराष्ट्र राज्य वर्षभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य होणार असल्याची आशा‌ यावेळी व्यक्त केली‌.

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ म्हणाले, महसूल सप्ताहात युवा संवाद आयोजित करण्यात आला. जिल्ह्यात १०७ महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. जिल्ह्यातील ३८ महाविद्यालयांसोबत मतदार जागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. शासनाचे विभाग आता कालानुरूप तंत्रज्ञानस्नेही होत आहेत‌. ऑनलाईन सेवा देण्याचे काम करत आहेत. शासनाप्रती संवेदना निर्माण करण्याचे काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा योजनांचा प्रचार-प्रसार करण्यात येईल.

संजय मालपाणी म्हणाले, युवकांचा समाजाशी संवाद होणे गरजेचे आहे. महसूल खाते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत पोहचणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण केलेली विद्यार्थ्यांनी सायली मांडे हिने ही यावेळी आपले मत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सायली मांडे, प्रमोद गांजवे, ऋत्विक खासे, संदीप गोसावी, यशवर्धन कासार, श्रेयस मांडेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. आभार तहसीलदार धीरज मांजरे यांनी मानले.

काय आहे ‘युवा ही दुवा‌’ उपक्रम…

संगमनेरमधील जवळपास १६ महाविद्यालयांशी समझोता करार करून महसूल विभागाच्या योजनांचा प्रसार करण्यात आला. यामध्ये ई-हक्क प्रणाली, ई-पीक पाहणी,‌ ई-चावडी नागरी पोर्टल, ऑनलाईन जमीन महसूल, लक्ष्मी मुक्ती योजना, घरबसल्या ऑनलाईन दाखले, मतदार नोंदणी, सलोखा योजनांचा प्रचार-प्रसार करण्यात आला. यासाठी प्रत्येक महाविद्यालयातून २० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट गुण ही देण्यात आले. या माध्यमातून महसूल विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 650
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अकोले तालुक्यातील कोतूळ…

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.